शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्याप्रकरणी खंडपीठाची सरकारला नोटीस

शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्याप्रकरणी खंडपीठाची सरकारला नोटीस

मुंबई : शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयविरोधात मुंबई उच्च न्यायालायात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आता खंडपीठाने केंद्र व राज्य सरकारला नोटीस पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर या याचिकार्त्यंच्या मागणीवरून या प्रकरणाची सुनावणी देखील पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता 24 एप्रिलला होणार आहे.

या याचिकांमध्ये सय्यद मोईनोद्दीन इनामदार, हुसैन पटेल, मुकुंद गाडे (बीड), अंजारोद्दीने कादरी (पैठण) व इतरांनी ॲड. सईद एस शेख या सर्वांकडून वेगवगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यामध्ये म्हटले गेले आहे की, केवळ धर्मांध लोकांच्या मागणीवरून शहराचे नाव बदलण्यात आले असून हे बेकायदेशीर आहे.

Uddhav Thackeray : राजकारणात कटुता वाढत असताना दिलदार माणूस गेला

शहराला ऐतिहासिक वारसा आहे. विविध दरवाजांचं शहर अशी त्याची ओळख आहे. ते आजही चांगले आहेत. यामुळेच फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या जी20 परिषदेत आलेल्या शिष्टमंडळाला शहराचं हेच ऐतिहासिक वैभव दाखवण्यात आले. तसेच औरंजेबाने जरी या शहराची स्थापना केली असली तरी अनेक हिंदू लोक त्याकाळातही उच्च पदांवर होते. असं देखील या याचिकांमध्ये म्हटले गेले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube