Download App

Video : ‘दुप्पट किंमत द्या…’ अनंत अंबानी यांनी खरेदी केल्या 250 कोंबड्या, कारण जाणून घ्या…

Anant Ambani bought 250 chickens : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) हे अनेकदा चर्चेत असतात. आजकाल ते जामनगर ते द्वारका या 140 किलोमीटरच्या पायी प्रवासामुळे चर्चेत आहे. मात्र, दरम्यान, या प्रवासादरम्यान एक बातमी समोर आलीय. ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. खरं तर, या प्रवासादरम्यानच अनंत अंबानी यांनी दुप्पट किंमत देऊन सुमारे अडीचशे कोंबड्या (Anant Ambani Video) खरेदी केल्या. यामागील कारण काय आहे, ते आपण जाणून घेऊ या.

अनंत अंबानी यांनी पायी प्रवास करत असताना पाहिलं की, एका ट्रकमधून 250 कोंबड्या कत्तलखान्यात नेल्या जात होत्या. त्यांनी ताबडतोब ते वाहन थांबवले आणि ड्रायव्हरशी बोलल्यानंतर दुप्पट किंमत देऊन कोंबड्या विकत (Viral Video) घेतल्या. यानंतर ते म्हणाला की, आता आपण त्यांना सांभाळू, मोठं करू. हातात कोंबडी घेऊन पुढे जाताना अनंतने ‘जय द्वारकाधीश’ असा नाराही दिला.

‘रेल्वे मार्ग ते बंधाऱ्याचा विस्तार’ फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत 12 मोठे निर्णय, वाचा सविस्तर…

अनंत अंबांनी यांचा हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल ( Anant Ambani bought chickens) होतोय. बाबा द्वारकाधिश नावाच्या X अकाउंटवर देखील हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. कॅप्शनमध्ये लिहिलंय की, हा व्हिडिओ तुमचं हृदय जिंकेल.

अनंत अंबानी यांच्याच्या प्रवासाच्या पाचव्या दिवशी, ते वडत्रा गावाजवळील विश्वनाथ वेद संस्कृत पाठशाळेत पोहोचले होते. तिथे त्यांनी संस्थापक मगनभाई राज्यगुरू यांचे चरणस्पर्श करत त्यांचे आशीर्वाद घेतले. अनंत अंबानी यांनी 28 मार्च रोजी जामनगरमधील मोती खावडी येथून आपला प्रवास सुरू केला. ते 10 एप्रिल रोजी द्वारका येथे त्यांचा 30 वा वाढदिवस साजरा करतील. लोकांना कोणतीही गैरसोय होऊ नये. म्हणून ते रात्री प्रवास करत आहेत.

Disha Salian Case : न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न अन् वकीलांकडून मोठी घोषणा…

माध्यमांशी बोलताना अनंत अंबानी म्हणाले की, कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी मी नेहमीच भगवान द्वारकाधीशांचे स्मरण करतो. तरुणांना माझा संदेश आहे की, देवावर श्रद्धा ठेवा, कारण जिथे देव आहे तिथे काळजी करण्याची काहीच गरज नाही. अनंत अंबानी त्यांच्या ‘वंतारा’ प्रकल्पाद्वारे वन्यजीव संवर्धनात सक्रिय आहेत. केंद्र सरकारने त्यांना अलिकडेच प्राणी कल्याणासाठी ‘प्राणी मित्र राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मानित केले आहे. वांतारा येथे 2000 हून अधिक प्रजातींमधील 1.5 लाखांहून अधिक प्राण्यांची सुटका करण्यात आली आहे.

 

follow us