भोसरी मतदार संघातील 4 दारु दुकाने ‘सील’, आमदार महेश लांडगेंनी मानले मुख्यमंत्री अन् अजितदादांचे आभार

भोसरी मतदार संघातील 4 दारु दुकाने ‘सील’, आमदार महेश लांडगेंनी मानले मुख्यमंत्री अन् अजितदादांचे आभार

MLA Mahesh Landge On 4 liquor shops sealed : भोसरी (Bhosari) मतदार संघातील 4 दारु दुकाने ‘सील’ करण्यात आली आहेत. यासंदर्भात आमदार महेश लांडगे यांची (Mahesh Landge) प्रतिक्रिया समोर आली आहे. महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधील नियमांचे उलंघन करुन रहिवाशी क्षेत्रात सर्वसामान्य नागरिक आणि सोसायटीधारकांना त्रासदायक ठरणाऱ्या 4 दारु विक्री दुकानांचा (liquor shops sealed) जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी परवाना कायमस्वरुपी रद्द केला. स्थानिक नागरिक, सोसायटीधारकांनी या निर्णयाचे स्वागत करीत आनंदोत्सव केला.

हा मुद्दा आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 11 मार्च 2025 रोजी मांडला होता. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) सकारात्मक उत्तर दिले होते. तसेच, कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. संपूर्ण महाराष्ट्रभरात अशा प्रकारे कारवाई करावी आणि सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा. याकरिता कायद्यामध्ये सुधारणा करण्याबाबत आम्ही पाठपुरावा करणार आहोत.

सीसीटीव्ही पुरावे समोर आणा, कारागृहातील मारहाण प्रकरणानंतर महादेव गीतेच्या पत्नीचे गंभीर आरोप

आमगार महेश लांडगे यांनी याप्रकरणी म्हटलंय की, विधानसभेच्या अधिवेशनात आमच्या मतदारसंघातील काही नागरिकांच्या तक्रारी घेवून आम्ही त्याठिकाणी मांडत होतो. त्याचप्रमाणे सरकारी योजनांचा फायदा आमच्या मतदारसंघातील (Maharashtra Politics) नागरिकांना कसा होईल, यादृष्टीने वेगवेगळ्या आयुधांच्या साहाय्याने आम्ही आमचं म्हणणं विधानसभेत मांडत होतो. असाच एक प्रश्न, जो राज्याच्या दृष्टीने फार महत्वाचा आणि गरजेचा होता. मला असं वाटलं की, हा प्रश्न केवळ माझ्या मतदारसंघासाठी नसेल तर संपूर्ण राज्यात अशीच परिस्थिती असेल.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, तसाच माझ्या इथे मोरे वस्ती म्हणून एरिया आहे. अंगणवाडी रोड आहे. त्या रोडवरून जाणाऱ्या येणाऱ्या महिलांच्या काही तक्रारी होत्या. तिथे देशी दारूचं दुकान होतं. त्या आजुबाजूच्या परिसरात असे व्यवसाय सुरू केल्याने तिथे फार वाईट परिस्थिती होती. तिथल्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना, माता-भगिणींना त्रास होतो. त्यासंदर्भात काही प्रश्न मी विधानसभेत मांडले. यावर अजितदादांनी एकदम सकारात्मक निर्णय दिलाय. यासंदर्भात मी स्वत: देवेंद्रभाऊंसोबत बोललो होतो. हा निर्णय झाल्यानंतर काल यासंदर्भात एक हिअरिंग लावण्यात आलं होतं.

विखे-थोरातांमध्ये आता नवा सामना; खताळांनाबरोबर घेऊन’गणेश’चा बदला घेणार

माझ्या मतदारसंघातील अशा काही दुकानांचा त्रास होत होता, त्यासंदर्भात आम्ही उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार केली. त्याची सुनावणी कलेक्टर महोदयांकडे झाली. त्याच्यानंतर उत्पादन शुल्क विभागाची टीम आणि राजपूत साहेब यांचा निर्णय झाला. बंदीचे आदेश आदरणीय कलेक्टर महोदयांनी दिले. एक्साईज डिपार्टमेंटनी या आदेशांची त्वरीत अंमलबजावणी करत दोन-तीन बिअर शॉपी आणि देशी दारूचे दुकान आम्ही सील करून टाकले.

तिथल्या लोकांच्या जर प्रतिक्रिया घेतल्या तर महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रतिक्रिया तुम्हाला पाहायला मिळतील. इतका उत्सुफूर्तपणे त्यांनी आनंदोत्सव साजरा केला, म्हणजे त्यांना होणारा त्रास ते दुकानं बंद झाल्यानंतर गेला, अशी प्रकारची भावना त्यांच्या डोळ्यासमोर होती. तिथल्या नागरिकांमध्ये होती. मला यानिमित्ताने असं आवाहन करायचं आहे की, अशी परिस्थिती ज्या-ज्या सोसायटीमध्ये असेल, त्या-त्या ठिकाणी आपण उत्पादन शुल्क प्रशासनाला, स्थानिक प्रशासनाला यासंदर्भात निवेदन दिलं पाहिजे.

सगळ्या या निर्णयाच्या संदर्भात मनापासून देवेंद्रभाऊ आणि त्यांच्या मंत्र्‍यांचे मी आभार मानतो. हा निर्णय केवळ माझ्या मतदारसंघात नाही, तर राज्यात ज्या-ज्या ठिकाणी अशी परिस्थिती असेल त्यांच्यासाठी झालेला हा निर्णय आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो, असं देखील आमदार महेश लांडगे यांनी म्हटलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube