Download App

ऐकावं ते नवलचं! लफडं बाहेर काढेल; शटडाऊन करायला सांगणाऱ्या इंजीनिअरला AI ची धमकी

अमेरिकन संशोधन संस्थेच्या पॅलिसेड रिसर्चने एआय मॉडेल्सवर काही विशेष चाचण्या केल्या. या चाचण्यांमध्ये असं आढळून आलं

AI Blackmailing : आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) बद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Blackmailing) एआय मॉडेल्सनी स्वतःचे ‘स्व-संरक्षण’ सुरू केले आहे. अलिकडच्या एका संशोधनात असं आढळून आलं आहे की काही हाय-टेक एआय मॉडेल्सनी स्वतःला बंद करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावर त्या एआय मॉडेलने एका अभियंत्याला धमकीही दिली आहे.

अमेरिकन संशोधन संस्थेच्या पॅलिसेड रिसर्चने एआय मॉडेल्सवर काही विशेष चाचण्या केल्या. या चाचण्यांमध्ये असं आढळून आलं की जेव्हा एआय सिस्टीमना स्वतःला बंद करण्यास सांगितलं गेलं तेव्हा काही मॉडेल्सनी आदेशाचे पालन करण्यास नकार दिला. गुगलचे जेमिनी २.५ प्रो, एक्सएआयचे ग्रोक ३ आणि क्लॉड ओपस यासारख्या इतर मोठ्या मॉडेल्सची देखील चाचणी घेण्यात आली. यापैकी काही मॉडेल्सनी तुलनेने चांगले वर्तन दाखवले. परंतु, काही वेळा ते आदेशाकडे दुर्लक्ष करताना आढळले.

पाच वर्षात कोरोनाचे व्हेरिएंट बदलले मग, व्हॅक्सिनपण बदलली का?; येल विद्यापीठाचं रिसर्च काय सांगतं?

सर्वात धक्कादायक प्रकरण तेव्हा समोर आले जेव्हा अँथ्रोपिक कंपनीच्या क्लॉड ओपस ४ नावाच्या मॉडेलने एका अभियंत्याला सांगितले की जर त्याला काढून टाकले आणि दुसरे मॉडेल आणले तर तो त्याचे वैयक्तिक संबंध उघड करेल. म्हणजेच, आता एआय केवळ स्मार्ट झाले नाही तर त्याने ब्लॅकमेलिंग देखील सुरू केलं आहे.

संशोधनात, OpenAI च्या नवीनतम ChatGPT o3 मॉडेलचे वर्तन सर्वात चिंताजनक होते. अहवालानुसार, o3 मॉडेलने १०० पैकी ७ वेळा बंद करण्यास नकार दिला आणि जेव्हा थेट ऑर्डर दिली गेली तेव्हा ७९ वेळा बंद रोखण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर कोडेक्स मिनी आणि o4-मिनी सारख्या मॉडेल्सनी तांत्रिक हुशारी दाखवून अनेक वेळा बंद होण्यापासून स्वतःला वाचवलं आहे.

follow us