Download App

राजस्थान विधानसभा निवडणुकीत घोषणांचा पाऊस, 400 रुपयांत गॅस सिलिंडर देणार

Rajasthan assembly elections : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीत (Rajasthan assembly elections) सर्वच राजकीय पक्ष जनतेला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी आश्वासने देत आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी आणखी एक मोठे आश्वासन दिले आहे. गेहलोत यांनी राज्यातील जनतेला 500 रुपयांऐवजी केवळ 400 रुपयांना गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे.

500 रुपयांचे सिलिंडर 400 रुपयांना देण्याची घोषणा
अशोक गेहलोत म्हणाले की, आमचे सरकार आल्यास 500 रुपयांचा सिलिंडर 400 रुपयांना मिळेल. यासोबतच शेतकऱ्यांना 15 लाख रुपयांचा आपत्ती विमाही दिला जाणार आहे. अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत समाविष्ट असलेल्या कुटुंबांना सिलिंडरसाठी 500 रुपयांऐवजी 400 रुपये द्यावे लागतील. आपत्ती विमा: गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी विमा फायदेशीर ठरेल.

मराठा आंदोलकांवर लाठीचार्जचे आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिले नव्हते, आरटीआयमधून उघड

राजस्थान एकमेव राज्य, जिथे जन्मठेपेची शिक्षा दिली जाते
अशोक गेहलोत म्हणाले की, आम्ही दिलेल्या 7 हमी अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर भारतीय जनता पक्षाचे नेते धर्म आणि जातीच्या आधारावर लोकांना भडकवण्याचे काम करत आहेत. पेपर लीकच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये उच्च न्यायालय आणि लष्कराचे पेपर लीक झाले होते, पण संपूर्ण देशात राजस्थान हे एकमेव राज्य आहे जिथे पेपर लीकवर जन्मठेपेचा कायदा करण्यात आला आहे. पंतप्रधानांना देशाची काळजी असायला हवी. पेपर लीक होण्याचे कारण देशात असुरक्षिततेचे वातावरण का आहे, हे जाणून घेतले पाहिजे.

‘…तर तुमची तिरडी बांधली जाईल’; हिंदुराष्ट्राची मागणी करताना बागेश्वर बाबांचं मोठं विधान

अशोक गेहलोत सोमवारी राजस्थानमधील अलवर शहरातील विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार अजय अग्रवाल यांच्या समर्थनार्थ सभेला संबोधित करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत अनेक मंत्रीही उपस्थित होते. नुकताच भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करताना 500 रुपयांचे सिलिंडर 450 रुपयांना मिळणार असल्याचे सांगितले होते, मात्र आता मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा करून भाजपवर वरचढ झाले आहेत.

Tags

follow us