Atiq Ahmadचे नाशिक कनेक्शन : भावाने मरण्यापूर्वी ज्याचे नाव घेतले तो गुड्डू अटक

Atiq Ahmed: प्रयागराज येथे गॅंगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अतिकचा भाऊ काल मीडियाला बाईट देताना गुड्डू गुड्डू असे शब्द उच्चारात होता. तोच गुड्डूचे नाशिक कनेक्शन उघडकीस आले आहे. गड्डूचा काल शनिवारी यूपी पोलिस नाशिकमध्ये शोध घेत होत होते. त्याला आज नाशिकमधून पकडण्यात आले असल्याची माहिती […]

Gudu Nashik

Gudu Nashik

Atiq Ahmed: प्रयागराज येथे गॅंगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अतिकचा भाऊ काल मीडियाला बाईट देताना गुड्डू गुड्डू असे शब्द उच्चारात होता. तोच गुड्डूचे नाशिक कनेक्शन उघडकीस आले आहे. गड्डूचा काल शनिवारी यूपी पोलिस नाशिकमध्ये शोध घेत होत होते. त्याला आज नाशिकमधून पकडण्यात आले असल्याची माहिती यूपी पोलिसांच्या विशेष पथकाने जाहीर केली आहे.

उद्या एखादा गँगस्टर… अतिक अहमदच्या हत्येनंतर भाजप नेत्याचं आधीचं ट्विट चर्चेत!

उमेश पाल हत्याकांडात गँगस्टर अतिक अहमद, त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांना जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. काल या दोघांना प्रयागराज येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात येत होते. त्यावेळी माध्यमांशी अश्रफ बोलताना गुड्डू मुस्लिम असा शब्द उच्चारात होता. त्याचवेळी तिघांनी या दोघांवर गोळ्या झाडल्या. त्यात दोघे ही जागीच ठार झाले. दुसरीकडे यूपी पोलिसाचे पथक हे गुड्डूचा शोध घेत होते. गुड्डू हा नाशिकमधील एका हॉटेलमध्ये लापल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी रात्रीच गुड्डूला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि रविवारी त्याला अटक केली आहे.

Atiq Ahmed च्या डोक्यात गोळी मारली कोणी? त्यांना व्हायचंय यूपीचा डॉन

गड्डू मुस्लिम हा अतिक गँगचा सदस्य आहेत. उमेश पाल हत्याकांडात त्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे आहेत. उमेश पालवर त्याने बॉम्ब फेकल्याचा आरोप त्याच्याविरोधात आहे. गुड्डू बम्बाज असे त्याचे नाव पडलेले आहे.

गुड्डू हा अट्टल गुन्हेगार असून, तो शाळेपासून गुन्हेगारी जगतात आहे. तो देशी बॉम्ब बनविण्यात तरबेज असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर तो मोठ्या गुन्हेगारी जगतात सहभागी झाल्याची माहिती पोलिस देतात.

Exit mobile version