Atiq Ahmed च्या डोक्यात गोळी मारली कोणी? त्यांना व्हायचंय यूपीचा डॉन
Atiq Ahmed Shot Dead : आधी गँगस्टर आणि नंतर राजकारणी (Politician)झालेला अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अश्रफला (Ashraf Ahmed)गोळ्या घालून ठार मारल्याप्रकरणी अटक केलेले तीन हल्लेखोर हे अट्टल गुन्हेगार आहेत. त्यांनी लहान वयापासूनच गुन्हेगारीच्या (Criminal)जगतात प्रवेश केला होता. खून, दरोडा यासह गंभीर गुन्ह्यात तिघेही तुरुंगात गेले आहेत. तुरुंगातच त्यांची मैत्री झाली. या तिघांना अतिक आणि अशरफची हत्या करून डॉन व्हायचे होते, अशी माहिती समोर आली आहे.हमीरपूरचा रहिवासी सनी, कासगंजचा रहिवासी अरुण मौर्य आणि बांदा येथील लवलेश तिवारी या तिघांनाही अतिक अहमद आणि अशरफ अहमद या दोघा भावांची हत्या केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस रेकॉर्डनुसार ते अट्टल गुन्हेगार आहेत. तिघांचीही कोल्विन रुग्णालयात ठेवून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
नवी मुंबईत आज ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळा, मंत्री अमित शाहांच्या हस्ते डॉ. धर्माधिकारींचा सन्मान
सनीने सुरुवातीला सांगितले की, तो प्रयागराजमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करतो. तर दुसरा स्वत:ला विद्यार्थी म्हणत होता. तिघांचीही कसून चौकशी केल्यानंतर तिघांचाही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं समोर आलं आहे.
किरकोळ गुन्ह्यात तुरुंगात गेल्याने प्रसिद्धी मिळत नसल्याचे तिघांनीही पोलिसांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा पहिल्यापासूनच काहीतरी मोठे करण्याचा विचार होता. त्याचवेळी अचानक अतिक आणि अशरफ यांना पोलीस कोठडीत घेऊन रुग्णालयात उपचारासाठी गेल्याचे समजले. अतिक आणि अशरफ यांना मारले तर राज्यात मोठे नाव होईल, असा कट या तिघांनी रचला. जे अतिकला घाबरत होते ते आता आपल्याला घाबरतील असा त्यांचा मानस होता.
शुक्रवारीही अतिकवर हल्ला करण्यापूर्वी तिघेही हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि त्यांनी रेकी केली. सर्वत्र पाहिल्यानंतर शनिवारी पोहोचले आणि पत्रकार बनून गॅंगस्टर अतिक अहमद आणि अशरफ या दोघांचाही सहज अंत केला. मात्र, त्याच्या वक्तव्यानंतरही पोलीस त्याच्या स्थानिक पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून तपशील गोळा करत आहेत. शनिवारी रात्रीच तिन्ही जिल्ह्यांच्या पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला.
त्याच्या कुटुंबीयांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक केलेले आरोपी एका न्यूज चॅनलच्या आयडीने तिथपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्याकडे ब्रँडेड कंपनीचा कॅमेरा आणि तीन पिस्तुल मिळाली आहेत. त्याचवेळी या घटनेनंतर प्रयागराजची सीमा सील करण्यात आली.