उद्या एखादा गँगस्टर… अतिक अहमदच्या हत्येनंतर भाजप नेत्याचं आधीचं ट्विट चर्चेत!

उद्या एखादा गँगस्टर… अतिक अहमदच्या हत्येनंतर भाजप नेत्याचं आधीचं ट्विट चर्चेत!

Atiq Ahmed Murder Case : उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये गुंड अतिक अहमदसह भाऊ अशरफची हत्या झालीय. प्रसारमाध्यमांसमोरच दोघांची हत्या झाल्याने देशभरात एकच खळबळ उडालीय. दरम्यान, या हत्येनंतर भाजप नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांचं 28 मार्चला केलेलं ट्विट चर्चेत आलंय.

आष्टी तालुक्यात तुफान गारपीट, बळीराजा पुन्हा संकटात

तेजिंदर पाल सिंह बग्गा ट्विटमध्ये म्हंटल होतं, “अशा हाय प्रोफाईल अपराध्यांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या ताफ्यासोबत माध्यमांना परवानगी नसावी. उद्या एखादा गँगस्टर, माध्यम प्रतिनिधी बनून त्या अपराध्याला गोळी झाडू शकतो”.

काल रात्रीच्या सुमारास अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, त्याआधी दोन दिवसांपूर्वीच पोलिसांकडून अतिकचा मुलगा असदचा एनकाऊंटर करण्यात आला.

कर्नाटकात भाजपचे आणखी बिनसले, माजी मुख्यमंत्र्यांने दिला अल्टिमेटम

अतिकचा मुलगा असद, गुड्डू मुस्लिम, गुलाम, अरबाज विजय उर्फ उस्मान चौधरी हे 24 फेब्रवारी रोजी उमेश पाल यांच्या झालेल्या हत्येप्रकरणी सीसीटिव्हीमध्ये कैद झाल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांकडून अतिक अहमदत्या गॅंगविरोधात ठोस कारवाईची भूमिका घेतल्याचं दिसलंय.

Gautami Patil म्हणाली मला लग्न करायचंय; पठ्ठ्याने थेट पत्रच धाडलं…

दरम्यान, अतिकने 44 वर्षांत निर्माण केलेलं स्वत:चं अस्तित्व उत्तर प्रदेश पोलिसांकडून फक्त 51 दिवसांत उद्धवस्त करण्यात आलं आहे. अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमदला प्रयागराजमधील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात येत असतानाच त्यांच्या गोळीबार झाला. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला. गोळीबार करणाऱ्यांनी लगेचच आत्मसमर्पण केलं. उमेश पाल खून प्रकरणात हे दोघे मुख्य आरोपी होते.

Shital Mhatre : त्यांना सत्तेसाठी भीम शक्तीची आठवण येते… म्हात्रेंचा ठाकरेंना टोला

अतिक अहमदला उमेश पाल हत्या प्रकरणी न्यायालयात नेण्यात आलं. त्याचंवेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधींच्या गाड्याही अतिक अहमदला नेत असतानाच्या ताफ्यात होत्या. या संपूर्ण घटनेवरुन भाजप नेते बग्गा यांनी माध्यमांचा प्रतिनिधीच हत्या घडवून आणू शकतो, असं भाकीत केलं होतं. त्यांचं भाकीत अखेर खरं ठरल्याची चर्चा सध्या उत्तर प्रदेशात रंगली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube