ATS Action : गुजरातमध्ये एटीएसकडून (ATS) मोठी कारवाई करण्यात आलीयं. अहमदाबाद विमानतळावरुन (Ahmadabad Airport) इसिसच्या चार दहशतवाद्यांना (Terrorist) अटक करण्यात आलीयं. अटक करण्यात आलेले दहशतवादी ISIS दहशतवादी संघटनेची संबंधित असून ते श्रीलंकेतील नागरिक आहेत. एटीएसला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विमानतळावर कसून चौकशी सुरु करण्यात आली. या चौकशीदरम्यान, चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीयं. (Ats terrorist arrested by ahmadabad airport)
Four ISIS terrorists, who are Sri Lankan nationals, arrested at Ahmedabad airport: Gujarat ATS pic.twitter.com/pTHwPlZfnM
— ANI (@ANI) May 20, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात एटीएसला केंद्रीय एजन्सीकडून गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर एटीएसकडून विमानतळावर कसून झडती घेण्यात आली. या चौकशीमध्ये मूळचे श्रीलंकेचे नागरिक असलेल्या चार जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या चौघांचा गुजरात किंवा अन्य राज्यात काही संबंध आहे का? याचा तपास करण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपासून केंद्रीय यंत्रणांची अहमदाबाद विमानतळावर सोने आणि इतर वस्तूंच्या तस्करीवर करडी नजर आहे. यादरम्यान एक संशयित दिसला आणि त्याची कसून चौकशी केली असता चार जणांची नावे समोर आली. अटक करण्यात आलेले चारही लोक इसिसशी संबंधित असून ते या दहशतवादी संघटनेत अनेक काळापासून सक्रिय होते.