Download App

थेट कव्हरेज टाळा, पाकिस्तान युद्धा दरम्यान केंद्र सरकारचे मीडियाला निर्देश

India-Pakistan War : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) तणाव

India-Pakistan War : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) तणाव वाढत असून दोन्ही बाजूने हल्ले सुरु करण्यात आले आहे. भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देत लाहोर (Lahore) , कराची (Karachi) आणि पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद (Islamabad) येथे हवाई हल्ले सुरु केले आहे. तर दुसरीकडे संरक्षण मंत्रालयाने देशातील सर्व मीडिया चॅनेल, डिजिटल प्लॅटफॉमला युद्धाचे आणि सुरक्षा दलांच्या कारवायांचे थेट कव्हरेज किंवा रिअल-टाइम रिपोर्टिंग टाळावे असे आदेश दिले आहे.

संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, संवेदनशील आणि स्रोत-आधारित माहितीच्या उघडकीस येण्यामुळे ऑपरेशनची प्रभावीता धोक्यात येऊ शकते आणि सैनिक आणि नागरिकांचे जीवन देखील धोक्यात येऊ शकते. थेट कव्हरेज किंवा रिअल-टाइम रिपोर्टिंगमुळे सुरक्षा प्रयत्नांना कसा अडथळा निर्माण झाला हे दाखवण्यासाठी सरकारने भूतकाळातील घटनांचा उल्लेख केला – जसे की कारगिल युद्ध, 26/11 दहशतवादी हल्ले आणि कंधार विमान अपहरण .

केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स (सुधारणा) नियम, 2021 च्या कलम 6(1)(प) नुसार, दहशतवादविरोधी कारवाई दरम्यान केवळ नियुक्त अधिकाऱ्यांनाच वेळोवेळी माहिती देण्याची परवानगी असेल आणि फक्त त्यांनाच अहवाल देण्याची परवानगी असेल. सरकारने सर्व संबंधित पक्षांना सावधगिरीने, संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने अहवाल देण्याचे आणि राष्ट्रीय हितासाठी जास्तीत जास्त मानकांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

सरकारच्या या आदेशानंतर आता देशातील सर्व मीडिया चॅनेल आणि डिजिटस प्लॅटफॉमला पाकिस्तानविरोधात होत असलेल्या कारवाईचे थेट कव्हरेज किंवा रिअल-टाइम रिपोर्टिंग टाळता येणार नाही.

अंतर्गत सुरक्षेसाठी बैठक बोलवली…आम्ही अलर्टवर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

follow us