Download App

Ayodhya Ram Mandir : प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येत रामभक्तांचा महापूर; योगी सरकारचा मोठा निर्णय!

Image Credit: Letsupp

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते प्रभू श्रीरामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर आता सर्वसामान्यांसाठी रामाचं दर्शन सुरु करण्यात आलं आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी देशभरातून रामभक्त अयोध्येत दाखल होत आहे. अचानकच अयोध्येत रामभक्तांचा महापूर आल्याने योगी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील सर्वच सीमा बंद करण्यात आल्या असून अयोध्येकडे सरकारी वाहने वगळता कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जात नाही.

अयोध्येत जाणाऱ्या सर्व मार्गांवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयानंतर बांब, बॅरिअर्स लावून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अचानकच अयोध्येत रामभक्तांनी एकच गर्दी केल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. त्यामुळे आता ज्या गाड्यांवर भगवे झेंडे दिसत आहेत, अशा गाड्यांना अयोध्येत प्रवेश नाकारण्यात येत आहे.

शिर्डी लोकसभेसाठी चुरस वाढली… महाविकास आघाडीकडून आणखी एका पक्षाची दावेदारी

अयोध्येत जाणाऱ्या मार्गांवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून या मार्गांवरुन फक्त पासधारक, रुग्णवाहिका, डिझेल, पेट्रोल, दूध, भाजीपाला, गॅस सिलिंडर अशा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांची चाचपणी करुनच प्रवेश दिला जात आहे.

Horoscope Today : ‘ मिथुन’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…

अयोध्येत देशभरातून रामभक्तांची गर्दी झाली असून ही गर्दी रोखण्यासाठीच उत्तर प्रदेश सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा पोलिसांनी बॅरिअर्स लावले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही या रस्त्यांवरुन प्रवास करण्यास अडचण येत आहे.

108 रुग्णवाहिकांची संख्या वाढली, सेवा आणखी जलद मिळणार : बोट अन् शिशू रुग्णवाहिकाही सेवेत

योगींकडून हेलिकॉप्टरमधून पाहणी :
नूकताच अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला असून या सोहळ्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी देशभरातून असंख्या नागरिक अयोध्येत दाखल झाले आहेत. दुसऱ्याचं दिवशी अशा पद्धतीने गर्दी झाल्याचं समजताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत धाव घेत हेलिकॉप्टरने परिस्थितीची पाहणी केली आहे. त्यानंतर सीआरपीएफच्या पथकाकडे अयोध्येतील गर्दी कमी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

follow us

वेब स्टोरीज