Download App

Bharat Ratna: पी. व्ही नरसिंह राव यांना ‘भारतरत्न’ देत भाजपने एका दगडात किती पक्षी मारले?

Bharat Ratna: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह (Chaudhary Charan Singh), माजी पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव (PV Narasimha Rao) आणि कृषी क्षेत्रात अभूतपूर्व योगदान देणारे एमएस स्वामीनाथन (MS Swaminathan) यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. मात्र यामध्ये माजी पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव यांना ‘भारत रत्न’ देत भाजपने एका दगडात किती पक्षी मारले? आणि ते कसे? जाणून घेऊ सविस्तर…

पतीसोबत भांडण, कराडला निघाली पण मिरजला पोहचली; तिथेच बलात्कार अन् कर्नाटकात विक्री

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने विरोधी पक्षांना नामोहरम करण्याचा प्लॅन आखलाय. सध्या भाजपचे लक्ष्य हे 400 जागा जिंकणं हे आहे. त्यासाठी भाजपकडून एक-एक योजना आखली जात आहे. यासाठीच आज (9 फेब्रुवारी) तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी माजी पंतप्रधान पी. व्ही नरसिंहराव यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरेस्कार भारतरत्नने सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अगोदर 2019 मध्ये दिग्गज काँग्रेस नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न दिल्यानंतर भाजपने आणखी एका काँग्रेस नेत्याला आणि माजी पंतप्रधान पी. व्ही नरसिंहरावांना भारतरत्नाने सन्मानित केले आहे.

तीन खोक्यामधील सत्तासंघर्षात जनता वाऱ्यावर, जनाची नाही तर मनाची तरी..; कॉंग्रेसची सत्ताधाऱ्यांवर टीका

राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार नरसिंहराव यांना भारतरत्न देण्यामागे 2024 लोकसभा निवडणुकीसाठीची एक राजकीय चाल आहे. त्यातून भाजपने गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे. तो असा की, पंतप्रधान मोदी नेहमीच गांधी कुटुंबाने राव यांना अपमानित केलं असल्याचा आरोप करतात. त्यामुळे ज्यांचा काँग्रेस सन्मान करत नाही. त्यांचा सन्मान भाजप करतं. असा संदेश यातून देण्यात आला आहे. तसेच या निर्णयातून राव यांचं राज्य असलेल्या आंध्र प्रदेशमधील मतदारांना आकर्षित करण्याचा देखील भाजपचा हेतू आहे.

Shah Rukh Khan: किंग खान ‘वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट’मध्ये PM मोदींसोबत करणार ‘या’ विषयावर चर्चा

राव यांच्याबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकीय नेत्याच्या रूपात नरसिंहराव यांनी वेगवेगळ्या पदावर राहत देशाची सेवा केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्ष खासदार तसेच आमदार म्हणून त्यांनी केलेलं कार्य कायम स्मरणात राहील. राव यांनी देशाच्या आर्थिक विकासासाठी पायाभरणी केली. भारताला जागतिक बाजारपेठ खुली केली. ज्यामुळे नव्या युगाची सुरुवात झाली. तसेच परराष्ट्र व्यवहार, भाषा आणि शिक्षण या क्षेत्रातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिलं. त्यामुळे राव यांनी फक्त बदल केले नाही. तर देशाला सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसा मिळवून दिला.

मॉरिसने फायर केलेली बंदुक कोणाची? प्लॅन कसा होता? वाचा A To Z

तर पी. व्ही नरसिंहराव यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया दिली की, मी या घोषणेचे स्वागत करते. का करणार नाही? पंतप्रधान होण्याच्या अगोदर राव हे परराष्ट्र मंत्री, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री यासह अनेक महत्त्वपूर्ण पदावर राहिले. ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री देखील होते. त्यांचा जन्म 28 जून 1921 ला करीमनगर येथे झाला जे आता तेलंगणामध्ये आहे.

नॅशनल क्रश रोहित सराफची प्राजक्तासह रोमँटिक हैदराबाद सफर!

नरसिंहराव हे जरी भारतीय आर्थिक सुधारणांचे जनक असले. तरी गांधी कुटुंबासोबत असलेला त्यांचा दुरावा जगजाहीर होता. विरोधक असा देखील आरोप करतात की, 2004 मध्ये तेव्हा राव यांचे निधन झाले होते. तेव्हा त्यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयात नेण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. त्यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयाच्या बाहेर ठेवण्यात आलं होतं. तसेच राव यांच्या कुटुंबाकडून देखील गांधी कुटुंबाने त्यांना योग्य वागणूक न दिल्याचा आरोप केला जातो.

फडणवीस अकार्यक्षम, हतबल आणि लाचार, त्यांना माणूस आणि कुत्र्यामधील फरकही कळेना; पटोलेंचा घणाघात

भाजपकडून नरसिंहराव यांना भारतरत्न देण्या मागे आणखी एक हेतू आहे. तो म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला दक्षिण भारतात आपले पाय रोवायचे आहेत. त्यामुळे आंध्र प्रदेशातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि दक्षिण भारतातील पहिले पंतप्रधान होणारे पी व्ही नरसिंहराव यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रद्धांजली देण्याचं विसरत नाहीत. त्यानंतर आता नरसिंहराव यांना देण्यात आलेला भारतरत्न. या सर्व घटना क्रमानंतर लक्षात येते की, उत्तर भारतात भाजप आता एक मोठा प्रस्थापित पक्ष झालाय. मात्र दक्षिण भारत यामध्ये तेलंगाना आणि आंध्र प्रदेश यामध्ये भाजपलचं मोठ्या जागा मिळवण्याचे लक्ष आहे. त्यासाठीच भाजप चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपी आणि अभिनेता पवन कल्याण यांच्या जनसेना पार्टी यांच्याशी देखील संपर्क साधत असल्याचं सांगितले जात.

“पूर्वीचे ठाम अन् परखड राज ठाकरे शोधतोय…” : मनसेच्या महायुतीतील एन्ट्रीच्या चर्चांवर थोरातांची खोचक टीका

तसेच पी. व्ही नरसिंहरावांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर तेलंगणाचे उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्क आणि भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष व तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी देखील या घोषणेचे स्वागत केलं. विक्रम मार्क म्हणाले की, माजी पंतप्रधान नरसिंहराव यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला जाणे. हे तेलंगणा आणि काँग्रेससाठी अभिमानास्पद आहे. तसेच नरसिंहराव यांनी केलेल्या सुधारणांमुळे आज भारत देशातील चौथी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उभा आहे. असं म्हणत त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

तर चंद्रशेखर राव म्हणाले की, पी व्ही नरसिंहराव यांना देण्यात आलेला भारतरत्न पुरस्कार हा तेलंगणातील लोकांना देण्यात आलेला सन्मान आहे. तसेच बीआरएसच्या मागणीचा मान ठेवत नरसिंहराव यांना भारतरत्न दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार. असं राव म्हणाले आहेत. त्यामुळे 2024 च्या लोकसभेमध्ये दक्षिण भारतात पकड मजबूत करणे, कॉंग्रेस आणि गांधी कुटुंबापेक्षा राव यांचा भाजप कसा जास्त सन्मान करत आहे. हे दाखवून देत भाजपने पी. व्ही नरसिंह राव यांना ‘भारतरत्न’ देत भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. असंच म्हणावं लागेल.

follow us