Download App

एल्विश यादव हिटलिस्टवर! भाऊ गँगने घेतली गोळीबाराची जबाबदारी, धक्कादायक खुलासा…

Bhau Gang Firing At Elvish Yadavs House : हरियाणातील युट्यूबर एल्विश यादवच्या घरी झालेल्या गोळीबाराच्या (Shocking News) घटनेबाबत एक नवीन खुलासा झालाय. रविवारी सकाळी एल्विश यादवच्या (Elvish Yadav) घरी झालेल्या गोळीबाराची जबाबदारी भाऊ गँगचे (Bhau Gang) गुंड नीरज फरीदपूर आणि भाऊ रिटोलिया यांनी घेतली. त्यांनी ही सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली. गोळीबाराचे कारण देताना त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की, बेटिंग अॅपची जाहिरात करून एल्विशने अनेक घरे उद्ध्वस्त केली आहेत.

आज सकाळी गुरुग्राममधील युट्यूबर एल्विश यादवच्या घरी 25 ते 30 राउंड गोळीबार (Firing At Elvish Yadavs House) करण्यात आला. ही घटना घडली तेव्हा एल्विश घरी नव्हता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

‘ऑपरेशन सिंदूरवर शंका घेणाऱ्यांना… जोडे मारो’ मंत्री राधाकृष्ण विखेंचा राहुल गांधींवर निशाणा

पोस्टमध्ये काय लिहिले होते?

भाऊ गँगने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, आज एल्विश यादवच्या घरावर जी गोळी झाडण्यात आली, ती नीरज फरीदपूर आणि भाऊ रिटोलिया यांनी चालवली होती. पुढे त्यांनी लिहिलंय की, आज आम्ही त्यांची ओळख करून दिली आहे. एल्विशने सट्टेबाजीचा प्रचार करून अनेक घरे उद्ध्वस्त केली आहेत. पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, मी या सर्व सोशल मीडिया बग्सना इशारा देतो की, जो कोणी सट्टेबाजीचा प्रचार करताना आढळला तर त्याला कधीही फोन किंवा गोळी येऊ शकते. जो कोणी सट्टेबाजीत सहभागी असेल त्याने तयार राहावे, असा इशारा देण्यात आलाय. सध्या या सोशल मीडिया पोस्टची पुष्टी झालेली नाही.

‘रात गई, बात गई!’ पुढची इनिंग जोरदार, कोकाटेंचा विरोधकांना थेट इशारा

गायक फाजिलपुरिया यांच्या घरीही गोळीबार

एल्विश यादव यांच्या आधी बॉलिवूड गायक फाजिलपुरिया आणि त्याच्या फायनान्सरच्या घरीही गोळीबार झालाय. भाऊ गँगचा गँगस्टर हिमांशू भाऊ यानेही या गोळीबाराची जबाबदारी घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबाराच्या वेळी घरी फक्त एल्विशची आई आणि काम करणारे होते. एल्विश घरी नव्हता, तो परदेशात होता. एल्विशच्या वडिलांनी सांगितले की सुमारे 25 ते 30 राउंड गोळ्या झाडण्यात आल्या, तर पोलिसांचे म्हणणे आहे की फक्त 10-12 राउंड गोळीबार करण्यात आला. गुरुग्राम पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही घटना संध्याकाळी 5.30 च्या सुमारास घडली. तीन हल्लेखोर दुचाकीवरून आले होते, त्यापैकी दोघांनी गोळीबार केला. टोळीने केलेल्या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही, असं सांगितलं जातंय.

 

follow us