‘रात गई, बात गई!’ पुढची इनिंग जोरदार, कोकाटेंचा विरोधकांना थेट इशारा

‘रात गई, बात गई!’ पुढची इनिंग जोरदार, कोकाटेंचा विरोधकांना थेट इशारा

Minister Manikrao Kokate Statement : रात गई, बात गई… पुढची इनिंग जोरदार असेल, अशा शब्दांत मंत्री माणिकराव कोकाटे (Minister Manikrao Kokate) यांनी विरोधकांना थेट प्रत्युत्तर दिलंय. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर (Maharashtra Politics) सातत्याने होत असलेल्या टीकेला उत्तर देताना कोकाटे म्हणाले की, ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याबद्दल आता बोलण्यात काही अर्थ नाही. आम्ही पुढच्या वाटचालीवर लक्ष केंद्रित करत आहोत. पुढची इनिंग चांगली असेल, असा विश्वास देखील माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केलाय.

आज (रविवार) जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या वतीने भव्य पक्षप्रवेश (Ajit Pawar NCP) सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः उपस्थित राहणार आहेत.

धुळ्यात रंगला सापाच्या ‘बर्थडे पार्टी’चा थरार! केक कापून नागोबाचा वाढदिवस साजरा, युवक वनविभागाच्या ताब्यात

पक्षप्रवेश सोहळ्याची जोरदार तयारी

कोकाटे म्हणाले, मी संपर्क मंत्री असल्याने या कार्यक्रमाला उपस्थित राहणे अपरिहार्य आहे. माझी उपस्थिती हा फक्त पक्षप्रवेश सोहळ्यासाठी आहे, दुसरा कुठलाही विषय नाही.
या सोहळ्यात प्रतिभा शिंदे राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश करणार आहेत. जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस अजित पवार गटाची ताकद वाढत असून, ती ताकद लवकरच वास्तवात परावर्तित करू, असा विश्वास कोकाटेंनी व्यक्त केला.

“मुंबई लुटणारे तुमच्याच सरकारमध्ये, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही”, संजय राऊतांचा फडणवीसांवर घणाघात

आगामी निवडणुकांवर संकेत

निवडणुकीच्या रणनीतीबाबत बोलताना कोकाटे यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अपक्ष लढायच्या की युतीत, याचा अंतिम निर्णय पक्ष नेतृत्व घेईल.
दरम्यान, भाजप नेते गिरीश महाजन यांनी ‘स्वबळा’चा संकेत दिला असला तरी त्यांनी त्यांच्या पक्षाच्या धोरणाचा विचार करावा, असा टोला कोकाटेंनी लगावला. “आमच्या निवडणुका स्वबळावर की महायुतीत लढायच्या, हा निर्णय आमचे नेते एकत्र बसूनच घेतील, असेही कोकाटे म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube