“मुंबई लुटणारे तुमच्याच सरकारमध्ये, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही”, संजय राऊतांचा फडणवीसांवर घणाघात

“मुंबई लुटणारे तुमच्याच सरकारमध्ये, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही”, संजय राऊतांचा फडणवीसांवर घणाघात

Sanjay Raut replies CM Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर (Devendra Fadnavis) घणाघाती टीका केली आहे. दहीहंडी उत्सवानिमित्त फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर टीका केली होती. मुंबई आणि ठाणे लुटणाऱ्यांची हंडी आम्ही फोडली असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर आज खासदार संजय राऊत यानी जोरदार हल्लाबोल केला. मुंबईला लुटणारे तुमच्याच सरकारमध्ये आहेत असा टोला राऊत यांनी लगावला.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी फडणवीसांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिले. मुंबई आणि ठाणे लुटणारे त्यांच्याच सरकारमध्ये आहेत. मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या 90 हजार कोटींच्या ठेवी आमच्या काळात ठेवल्या गेल्या. ते काही मुंबई लुटल्यामुळे? 90 हजार कोटींच्या ठेवी जे सरकार किंवा जी पालिका ठेवते ते आम्ही लुटल्यामुळे ठेवली का? या 90 हजार कोटींची लूट तुम्ही गेली. नगरविकास मंत्री (एकनाथ शिंदे) सध्याचे जे आहेत किंवा मुख्यमंत्री जे होते त्यांनी दोन लाख कोटींची कामे दिली.

..तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही

तिजोरीत पैसे नाहीत, कोणाला कोणती कामं दिली याचा पत्ता नाही, पण त्या दोन लाख कोटींवरचं 25% कमिशन त्यांच्याकडे पोहोचलं आहे. त्यात फडणवीस यांचे लोकं सुद्धा आहेत. कोणी लुटली महानगरपालिका ही मुंबईच्या जनतेला माहिती आहे आणि लुटमार करणाऱ्यांच्या हंड्या तुम्ही फोडत मुंबईपासून ठाण्यापर्यंत फिरत आहात. ज्यांनी मुंबई लुटली त्यांच्याच हंड्या आपण फोडत आहात. हंडीमध्ये दही, लोणी जे आहे हे ज्यांनी खाल्लं आहे त्यांच्या हंड्या आपण फोडत आहात. देवेंद्र फडणवीस तुमच्या आसपास जे चोर, दरोडेखोर आहेत त्यांना पाठीशी घालू नका. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

जगदीप धनखड सरकारच्या नजरकैदेत? संजय राऊतांचं थेट अमित शाहांना पत्र

ट्रम्पनंतर फडणवीस राजकारणातील जोकर

ही मुंबई कुणी लुटली आहे? गौतम अदानी कुणाची हंडी फोडत आहेत? हे गौतम अदानी यांची हंडी फोडणारी लोक गौतम अदानी यांच्या हंडीमध्ये जी मलाई आहे ती खाणारी हे लोकं आहेत. धारावीपासून मुंबईचे अनेक महत्त्वाचे भूखंड जे अदानींच्या घशात घातले ते देवेंद्र फडणवीस आमच्यावर टीका करत आहेत, आरोप करत आहेत. हा सगळ्यात मोठा जोक आहे. प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प नंतर जे कुणी राजकारणामध्ये जोकर असतील तर ते देवेंद्र फडणवीस झाले आहेत असा खोचक टोलाही राऊत यांनी लगावला.

नारायण राणेंचं दुकान तीनवेळा बंद

नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस हे सगळे दहीहंडी वीर आहेत. त्यांच्या हातातील मुरली वाजवत ते फिरतात. नारायण राणे यांचं दुकान आतापर्यंत तीन वेळा बंद झालं आहे. ते शिवसेनेमध्ये होते तेव्हा त्यांचं दुकान बंद केलं, मग ते काँग्रेस पक्षात गेले तेव्हा देखील त्यांचं दुकान बंद केलं. आता ते भारतीय जनता पक्षामध्ये आहेत ते मेहरबानीवर जगत आहेत. जसं एखाद्याला वृद्धाश्रमामध्ये टाकून जगवतात तसं ते कृत्रिम ऑक्सिजनवर जगत आहेत. त्यांनी आमचं दुकान बंद करण्याची भाषा करू नये. 2029 च्या निवडणुकीत कोकणामध्ये कोणाचं दुकान बंद होत आहे हे आपल्याला कळेल. मी वारंवार सांगत आहे नारायण राणे यांनी आपल्या वयाचे भान ठेवावे. आता त्यांनी जुनी भाषा करू नये असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला.

“एकनाथ शिंदेंना ‘लॉटरी’ नाही ‘मटका’ लागला”, मंत्री नाईकांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा चिमटा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube