Download App

Bhopal Gas Tragedy : किंकाळ्या अन् मृतदेहांचा खच; हजारो लोक परत जागलेच नाहीत..

Bhopal Gas Tragedy Anniversary : भोपाळमधील गॅस गळतीची घटना मध्य प्रदेशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करून आहे. या घटनेने फक्त मध्य प्रदेशच नाही तर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. भोपाळ गॅस दुर्घटना (Bhopal Gas Tragedy Anniversary) ही एक असह्य वेदना आहे. ज्याची वेदना आजही जाणवते. 2-3 डिसेंबरच्या त्या रात्री अशी वेदनादायक आणि भयानक घटना घडली. ज्यामुळे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या लोकांना वेदना दिली. जे कुणीही विसरू शकणार नाही. 2-3 डिसेंबर 1984 रोजी भोपाळमधील युनियन कार्बाइड कीटकनाशक प्लँटमधून विषारी वायूची गळती झाली आणि काही वेळातच मृतदेहांचा खच पडला. रात्री गाढ झोपेत असलेल्या लोकांना कधीच जाग आली नाही. या भीषण दुर्घटनेचा काय परिणाम झाला याचा अंदाज यावरून लावता येतो की या अपघातानंतर विविध शारिरीक समस्यांनी ग्रासलेल्यांची संख्या हजारोंच्या घरात होती. ज्याचा परिणाम आजही दिसून येतो. भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर भावी पिढ्यांच्या आरोग्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. (Bhopal Gas Tragedy Anniversary)

या दुर्घटनेत 16 हजारांहून अधिक असल्याचा दावा अनेक कागदपत्रांमध्ये करण्यात आला आहे. तथापि, मध्य प्रदेश सरकारच्या आकडेवारीनुसार, भोपाळ गॅस दु्र्घटनेत 3 हजार 787 लोकांचा मृत्यू झाला. धोकादायक गॅस गळतीचा परिणाम आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांवरही झाला आणि त्यामुळे पाच लाखांहून आधिक लोकांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यापैकी सुमारे 40 हजार लोकांचे आरोग्य तात्पुरते तर सुमारे चार हजार लोकांना कायमस्वरुपी आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. काही जणांना कायमचे अपंगत्व आले. आजही भोपाळ गॅस दुर्घटनेमुळे तेथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले जातेय 2-3 डिसेंबरच्या त्या थंडीत रात्री असा कोलाहल झाला की हजारो लोकांना दुसऱ्या दिवशीची सकाळ काही पाहता आली नाही. विषारी वायूचा परिणाम इतका झाला की कारखान्याबरोबरच आजूबाजूच्या परिसरातील लोकही तिकडे धावू लागले आणि त्यांचा जीव वाचविण्यासाठी तिथे प्रचंड धावपळ दिसली.

Teleganan Assembly Election 2023 : निकालापूर्वीच कॉंग्रेसला घोडेबाजाराची भीती? डी. के शिवकुमारांवर मोठी जबाबदारी

Bhopal Gas Tragedy Anniversary

तसं पाहिलं तर 2-3 डिसेंबरच्या मध्यरात्री रासायनिक कारखान्यात गॅस गळती झाली. काहीतरी लीक होत असल्याचं एका कारखान्यातील कामगाराच्या लक्षात आलं. पाइपमधून पिवळ्या रंगाच्या वायूसह काही द्रव गळत असल्याचे त्याला दिसून आलं. हे दृश्य पाहिल्यानंतर त्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. पर्यवेक्षकाला काही समजण्याच्या आता गॅस जास्त प्रमाणात लीक झाला. नंतर तो संपूर्ण कारखान्यात पसरला. या कीटकनाशक प्लँटमधून 44 टनांहून जास्त घातक मिथाइल आयसोसायनेट वायूची गळती होऊन आजूबाजूच्या परिसरात पसरला हे जाणून घेणे येथे महत्वाचे आहे. यानंतर काही मिनिटातच घातक वायूने परिणाम दाखवण्यास सुरुवात केली. यामुळे लोकांन छातीत जळजळ, खोकला, डोळ्यात जळजळ आणि गुदमरल्यासारखे वाटू लागले.

या घातक वायूंचा प्रभाव इतका गंभीर होता की रात्रीच्या गाढ झोपेत असलेले शहरातील हजारो लोक कधीच जागे झाले नाहीत. या घटनेमुळे प्रचंड घबराट पसरली. जीव वाचविण्यासाठी लोक आपल्या मुलांसह दुसऱ्या शहरांकडू पळू लागले. तरीही या वायूचा प्रचंड परिणाम झाला. या शहरात चित्र असे होते की ठिकठिकाणी वेदना, किंकाळ्या अन् मृतदेहांचा खच पडला होता. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी युनियन कार्बाइड कंपनीचा कारखाना होता. या दुर्घटनेत 16 हजारांहून आधिक लोकांना जीव गमवावा लागल्याचा दावा केला जात आहे. त्यात लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे. इतकेच नाही तर या दुर्घटनेमुळे पाच लाखांहून आधिक लोक प्रभावित झाले होते. (Bhopal Gas Tragedy Anniversary)

लोकसभेची सेमीफायनल कोण जिंकणार? तीन राज्यात काँग्रेसची मुसंडी; राजस्थानात काँटे की टक्कर!

Tags

follow us