लोकसभेची सेमीफायनल कोण जिंकणार? तीन राज्यात काँग्रेसची मुसंडी; राजस्थानात काँटे की टक्कर!

लोकसभेची सेमीफायनल कोण जिंकणार? तीन राज्यात काँग्रेसची मुसंडी; राजस्थानात काँटे की टक्कर!

मुंबई : लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल म्हणून ओळखलेल्या गेलेल्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज (3 डिसेंबर) जाहीर होणार आहेत. आज सकाळी 7 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पोस्टल मतपत्रिका प्रथम मोजल्या जात आहेत. यानंतर सर्व पक्षांच्या प्रतिनिधींसमोर ईव्हीएमवरून मतमोजणी सुरू होणार आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत निकालाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राज्यांतील सत्ता कोण काबीज करत याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

तत्पूर्वी मध्य्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या तीन राज्यांमध्ये काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. तर राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळणार असल्याचेही सांगितले जात आहे. (election results of four states namely Rajasthan, Madhya Pradesh, Chhattisgarh and Telangana will be announced today)

मध्यप्रदेशमध्ये कमलनाथ यांना सत्ता पुन्हा मिळणार?

तीन वर्षांपूर्वी भाजपने ज्योतिरादित्य सिंधिया यांना हाताशी धरत काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली होती. आता ही सत्ता पुन्हा कमलनाथ यांना मिळणार असल्याचा अंदाज आहे. आजतक, पोलस्ट्रॅट आणि जन की बात या विश्वसनीय मानल्या जाणाऱ्या संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला सत्ता मिळणार असल्याचा अंदाज आहे. आज तक-अॅक्सिसच्या आकडेवारीमध्ये कॉंग्रेस 111 ते 121 जागा जिंकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर भाजपच्या पारड्यात 106 ते 116 जागा मिळणार असल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर इतर 6 जागा जिंकणार असल्याचं देखील सांगण्यात आले आहे.

एक्झिट पोलची आकडेवारी समोर

पोलस्ट्रॅट – कॉंग्रेस – 111 ते 121 , भाजप- 106-116, इतर – 00 ते 06

आज तक अ‍ॅक्सिस – कॉंग्रेस – 111 ते 121 , भाजप- 106-116, इतर – 00 ते 06

मॅट्रीझ – कॉंग्रेस – 97 ते107 , भाजप- 118 ते 130, इतर – 00 ते 02

जन की बात – कॉंग्रेस – 102 ते 125 , भाजप- 100 ते 123, इतर – 00 ते 05

राजस्थानमध्ये काँटे की टक्कर :

200 सदस्यांच्या राजस्थान विधानसभेत बहुमत मिळवणाऱ्या पक्षाला 101 चा जादुई आकडा गाठायचा आहे. श्रीगंगानगर जिल्ह्यातील श्रीकरणपूर येथील काँग्रेसचे उमेदवार गुरमीत सिंह कुन्नर यांच्या निधनामुळे 25 नोव्हेंबर रोजी 199 जागांवर मतदान झाले होते. दोन दशकांपासून राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाची खुर्ची भाजप आणि काँग्रेसभोवती फिरत आहे.

आज तक-अॅक्सिसच्या आकडेवारीनुसार राजस्थानात काँग्रेसला 86-106 जागा तर भाजपला 80-100 जागा मिळणार असल्याचे समोर आले आहेत. तसेच इतर अपक्ष उमेदवारांच्या कोट्यात 9 ते 18 जागा मिळणार आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षात सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. राज्यात .यंदा पहिल्यांदाच 75.45 टक्के मतदान झाले आहे. या वाढलेल्या बंपर मतदानाचा फायदा कोणाला मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेसचीच मुसंडी?

एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये काँग्रेस (Congress) आपली सत्ता कायम ठेवणार असल्याचे चित्र आहे. 90 विधानसभा सदस्यांच्या छत्तीसगडमध्ये इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोलच्या अंदाजानुसार या राज्यात काँग्रेसला 40 ते 50 जागा मिळतील. भाजपला 36 ते 46 जागा मिळतील. तसेच इतर पक्षांना 1 ते 5 जागा मिळतील असे हे एक्झिट पोल सांगत आहेत.

तेलंगणातच गुलाबी वादळाला ब्रेक!

तेलंगणाची विधानसभा 119 जागांची आहे. या जागांसाठी आज मतदान झाले आहे. चाणक्य संस्थेने काँग्रेसला सर्वाधिक 67-78 जागा दाखविल्या आहेत. तर बीआरएसला 22 ते 31 जागा दाखविल्या आहेत. भाजप आणि एमआयएमला मतदारांनी नाकारे असल्याचे चाणक्य संस्थेने आपल्या एक्झिट पोलमध्ये दाखविले आहे. भाजपला अवघ्या 6 ते 9 जागा आणि एमआयएमला अवघ्या 6 ते 7 जागा मिळण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube