Top army commander Saifullah Khalid killed : लष्करचा टॉप कमांडर सैफुल्ला खालिद पाकिस्तानमध्ये मारला गेल्याची मोठी बातमी समोर आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्याची गोळ्या घालून हत्या केली आहे. (Khalid) तो भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्येही सहभागी होता. तो बराच काळ पाकिस्तानात लपून त्याचे दहशतवादी नेटवर्क मजबूत करत होता. भारतीय एजन्सी देखील त्याचा शोध घेत होत्या, आज रविवार (दि. १८) रोजी अज्ञात हल्लेखोरांनी त्याची हत्या केली आहे.
पाकिस्तानकडून भारताच्या या निर्णयाची कॉपी; वाचा, कोण अन् कशासाठी जाणार परदेशात ?
सैफुल्लाह भारतावरील अनेक हल्ल्यांमध्ये सहभागी होता असंही सांगण्यात आलं आहे. २००६ मध्ये नागपूर उत्तर प्रदेशातील रामपूर येथील सीआरपीएफ कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्याच दहशतवाद्याने बेंगळुरूमध्येही कट रचला होता.
कोण होता सैफुल्ला खालिद?
सैफुल्लाह हा लष्करात कार्यरत होता. त्याला भारतातील अनेक हल्ल्यांची जबाबदारी देण्यात आली होती. त्या जबाबदारीनंतरही सैफुल्ला नेपाळला पळून गेला, तिथून त्याने भारतावर अनेक दहशतवादी हल्ले केले. त्याने नेपाळमध्ये आपला दहशतवादी तळ खूप मोठा बनवला होता. नंतर जेव्हा सुरक्षा यंत्रणांना माहिती मिळाली तेव्हा त्याला अटक करण्याची तयारी करण्यात आली. परंतु, तोपर्यंत तो परत पाकिस्तानात पळून गेला होता. सैफुल्लाहबद्दल अशीही माहिती मिळत आहे की तो वेगवेगळ्या नावांनी नेपाळमध्ये राहत होता आणि त्याने बनावट कागदपत्रे बनवली होती.