बिहारमध्ये पुन्हा नवीन ट्विस्ट, JDU 12 जागांवर 1,000 पेक्षा कमी मतांनी आघाडीवर

Bihar Election Result 2025 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आता हाती येण्यास सुरुवात झाली आहे.

Bihar Election Result 2025

Bihar Election Result 2025

Bihar Election Result 2025 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आता हाती येण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या ट्रेंडनुसार, भाजप (BJP) सध्या 84 , जेडीयू 77, राजद 35, लोजप 22 आणि सीपी (एमएल) 2 जागेवर आघाडीवर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बिहारमध्ये एनडीएचा मुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे जेडीयू 77 जागांवर आघाडीवर असला तरी सहा जागांवर जेडीयू (JDU) 1,000 पेक्षा कमी मतांनी आघाडीवर तर सहा जागांवर ते 500 पेक्षा कमी मतांनी आघाडीवर आहे. तर काही ठिकाणी भारतीय जनता पार्टी देखील कमी फरकाने पुढे असल्याने दुपारनंतर पुन्हा एकदा बिहारच्या राजकारणात (Bihar Election Result 2025) नवीन ट्विस्ट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 6 नोव्हेंबर रोजी आणि दुसऱ्या टप्प्यात 11 नोव्हेंबर रोजी 243 जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या. मुख्य निवडणूक अधिकारी विनोद सिंग गुंज्याल यांनी सांगितले की, मंगळवारी 122 जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात विक्रमी 68.79 टक्के मतदान झाले, जे राज्याच्या निवडणूक इतिहासातील आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. त्यांनी माहिती दिली की, पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबर रोजी झाले आणि 65.08 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दोन टप्प्यांच्या निवडणुकीत ऐतिहासिक 66.90 टक्के मतदानाची नोंद झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा हा आकडा 9.6 टक्के जास्त आहे.

Bihar Election Result 2025 : बिहारमध्ये मतमोजणीला सुरूवात, NDA की महागठबंधन कोण मारणार बाजी ?

7.45 कोटींहून अधिक मतदार, 2,600 + उमेदवार

बिहारमध्ये एकूण 74,526,858 मतदारांची यादी होती. एकूण 2,616 उमेदवारांनी निवडणूक लढवली आणि 12 मान्यताप्राप्त पक्षांपैकी कोणत्याही पक्षाने पुनर्मतदानाची विनंती केली नाही. आयोगाच्या मते, यावरून सर्व पक्षांनी निवडणुकीची पारदर्शकता मान्य केल्याचे दिसून येते.

Exit mobile version