Download App

लालूपुत्राचा पाय खोलात! यूपी अन् महाराष्ट्रात तेजस्वी यादव यांच्यावर FIR; नेमकं काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याच्या आरोपाखाली तेजस्वी यादव यांच्यावर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात गुन्हा दाखल झाला आहे.

Bihar Elections Tejashwi Yadav : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची जोरदार (Bihar Elections 2025) तयारी सुरू आहे. त्यामुळे येथील राजकारण ढवळून निघत आहे. या निवडणुकीच्या धामधुमीत एक मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे माजी उपमु्ख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध (PM Narendra Modi) आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात गुन्हा दाखल झाला आहे.

तेजस्वी यादव यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक कार्टुन शेअर केले होते. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीला ‘जुमलों की दुकान’ असे म्हणत त्यांची खिल्ली उडवली होती. याच पोस्टमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. पंतप्रधान पदावरील व्यक्तीच्या बाबतीत अशा पद्धतीची टीका करणे नागरिकांना रुचले नाही. महाराष्ट्रातील गडचिरोलीचे भाजप आमदार मिलींद रामजी नरोटे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर केस दाखल करण्यात आली. पीएम मोदी यांच्याशी संबंधित आक्षेपार्ह आणि अपमानजनक पोस्ट शेअर केल्याचा आरोप यादव यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

धक्कादायक! पाकिस्तानी महिलांच्या नावाचे मतदार ओळखपत्र; ‘या’ राज्यात उडाली खळबळ!

गडचिरोली पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या 196 (1)(ए)(बी), 356 (2)(3), 352, 353 (2) या कलमांन्वये एफआयर दाखल करण्यात आली आहे. बिहारमध्ये सध्या वोटर अधिकार यात्रा सुरू आहे. याच दरम्यान एफआयआर दाखल झाल्याने तेजस्वी यादव यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

दुसरीकडे उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे देखील भाजपा महानगर अध्यक्ष शिल्पी गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे सदर बाजार पोलिसांनी तेजस्वी यादव यांच्यावर एफआयआर दाखल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बेलगाम टिप्पणीमुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता पोलिसांनी तेजस्वी यादव यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिल्पी गुप्ता यांनी केली आहे.

काय म्हणाले होते यादव

तेजस्वी यादव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यासोबतच एक कार्टून होते. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गया येथील रॅलीला फक्त भाषणबाजीचे दुकान असे त्यांनी संबोधले होते. या पोस्टमध्ये त्यांनी पीएम मोदींना एका दुकानदाराच्या रुपात दाखवले. दुकानाच्या साइन बोर्डावर लिहिले होते ‘बयानबाजी की मशहूर दुकान.’ या पोस्टमध्ये त्यांनी बिहारमधील 20 वर्षांसह त्यांच्या 11 वर्षांच्या कार्यकाळातील कामांचा हिशोबही मागितला होता.

मोठी बातमी! देशात चॅटजीपीटीचं पहिलं ऑफिस उघडणार, पण नेमकं कुठं अन् कधी?

follow us