Cobra Snake in AIMIM MLA House : सापाचं नुसतं नाव घेतलं तरी अनेकांना धडकी भरते. समोर दिसला तर अनेकांना दरदरुन घाम फुटतो. भीतीने गाळण उडते. अशी परिस्थिती असताना जर एखाद्याच्या घरात सापच साप आहेत अन् तेही साधेसुधे नाही तर घातक विषारी कोब्रा. नुसता विचार केला तरी भीती वाटते पण ही घटना सत्य आहे. बिहार एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आमदार अख्तरुल इमान यांच्या घरात कोब्रा जातीच्या सापाचे 22 पिल्ले आढळून आली.
मेघालयात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
आमदार इमान यांचे किशनगंज जिल्ह्यातील अहमदनदगर येथे वडिलोपार्जित घर आहे. याच घरात साप होते. त्यानंतर सर्पमित्रांना बोलावून सापांना निसर्गात मुक्त करण्यात आले. या घरातून कोब्रा जातीच्या सापाची 22 पिल्ले आढळून आली. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी शेजारील घरातही तीन साप आढळून आले. इतक्या मोठ्या संख्येने साप आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या घरात एक भाडेकरू राहत होता. बाकीच्या खोल्या मात्र बंद होत्या. या व्यक्तीनेच येथे साप पाहिले. त्यानंतर साप पकडणाऱ्याला बोलावून घेत साप निसर्गात मुक्त करण्यात आले. या घरात आणखीही साप असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सापाची पिल्ले असल्याने मोठ्या सापाला पकडणे आणखी कठीण होऊन बसते असा अनुभव आहे.
अफजल गुरूला फाशी दिल्यानंतर जेलर सुनील गुप्ता ढसाढसा रडले, संपूर्ण प्रकरण काय होते?
आमदार अख्तरुल इमान किंवा त्यांच्या घरातील सदस्य किशनगंजला गेल्यानंतर या घरी जात असतात. या घराची बाहेरील खोली भाड्याने देण्यात आली होती. बाकीच्या खोल्या मात्र बंद होत्या. या बंद घरात इतक्या मोठ्या संख्येने साप आढळून आल्याने परिसरातील नागरिकांत घबराट पसरली आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने साप आले तरी कुठून, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता.