Download App

बिहारमध्ये ‘एनडीए’चं जागा वाटप ठरलं! घटक पक्ष वरचढ, महाराष्ट्रात काय होणार?

Bihar NDA’s Lok Sabha Seat Distribution : देशभरात लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election 2024)कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राज्यांमधील लोकसभा उमेदवार निश्चितीला वेग आला आहे. त्यातच आता बिहारमध्ये एनडीएचे जागावाटप निश्चित झाले आहे. बिहारमध्ये भाजप (BJP)लोकसभेच्या 17 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे. तर नितीश कुमार (Nitish Kumar)यांच्या जनता दल युनायटेडला 16 जागा मिळाल्या आहेत. त्याचबरोबर चिराग पासवान (Chirag Paswan)यांच्या लोक जनशक्ती पक्षाला (रामविलास) पाच जागा दिल्या आहेत. बिहारमध्ये आणि उपेंद्र कुशवाह आणि मांझी यांच्या पक्षाला प्रत्येकी 1 जागा देण्यात आली आहे. त्यामुळं आता महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कसा सोडविला जाणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

40 पेक्षा अधिक जागा कुठून मागून जिंकणार का? शिंदेंनी अ‍ॅक्टिंग करुन सांगत खिल्लीच उडवली

दुसरीकडे पशुपती पारस यांना एकही जागा देण्यात आली नाही. यापूर्वी पशुपती पारस यांना जागा मिळू शकते, अशी चर्चा होती. मात्र, एनडीएने पशुपती पारस यांच्या हाती भोपळाच दिल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. त्यात भाजपबरोबर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यासह काही छोटेमोठे पक्ष देखील आहेत. त्यामुळे आता कोणाला किती जागा मिळणार? हे पाहावं लागणार आहे.

‘उद्धव ठाकरेंना पत पाहूनच संधी’; एकनाथ शिंदेंनी भाषणाच्या वेळेवरुनही डिवचलं

संपूर्ण देशाप्रमाणे बिहारमध्येही एकूण सात टप्प्यांत मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यात पहिल्या टप्प्यात 4 जागांवर, दुसऱ्या टप्प्यात 5 जागांवर, तिसऱ्या टप्प्यात 5 जागांवर, चौथ्या टप्प्यात 5 जागांवर, पाचव्या टप्प्यात 5 जागांवर, सहाव्या टप्प्यात 8 जागांवर मतदान होणार आहे. सातव्या टप्प्यात 8 जागांवर लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे.

त्यामुळे आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 13 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 4 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर भाजपला 31 जागा मिळू शकतात. त्यातील वीस जागांवर भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. त्यामुळे आता अजित पवार गट एवढ्या जागांवर राजी होणार का? हे देखील पाहावं लागणार आहे.

follow us