Download App

बिहार हादरलं! व्हीआयपी प्रमुख मुकेश सहनींच्या वडिलांची हत्या; घरात सापडला मृतदेह

बिहार सरकारमधील माजी मंत्री आणि विकासशील इंसान पार्टी (व्हीआयपी) प्रमुख मुकेश सहनी यांचे वडिलांची हत्या करण्यात आली आहे.

Mukesh Sahani Father Murder : बिहार सरकारमधील माजी मंत्री आणि विकासशील इंसान पार्टी (व्हीआयपी) प्रमुख मुकेश सहनी यांचे वडिलांची (Mukesh Sahani) हत्या करण्यात आली आहे. या घटनेने बिहारमध्ये मोठी खळबळ (Bihar News) उडाली आहे. आज सकाळी त्यांच्या वडिलांचा मृतदेह आढळून आला. दरभंगा जिल्ह्याचे एएसपी यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. दरभंगा जिल्ह्यातील (Darbhanaga) सुपौल बाजार येथील सहनी यांच्या राहत्या घरी ही खळबळजनक घटना घडली. याच घरातून जीतन सहनी यांचा (Jitan Sahani) मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस मोठ्या संख्येने येथे दाखल झाले (Bihar Politics) होते. या घटने मागचं कारण अजून समोर आलेलं नाही.

Bihar Politics : आधी मासे, आता संत्री! भाजपला खिजवण्यासाठी यादव-सहनींचे ऑरेंज पॉलिटिक्स

दरभंगा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरातच त्यांची हत्या करण्यात आली. दरभंगा एएसपी जगन्नाथ रेड्डी यांनी सांगितले की जीतन सहनी यांचा मृतदेह घरात आढळून आला. हा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवून देण्यात आला आहे. या घटनेनंतर दरभंगा पोलीस दलाचे एसडीपीओ मनीष चंद्र चौधरी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

जीतन सहनी घरात एकटेच असताना काही अज्ञात लोक घरात घुसले आणि त्यांनी जीतन सहनी यांची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. हत्या का करण्यात आली याचं कारण अजून समोर आलेलं नाही. परंतु, पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा जीतन सहनी यांचे पुत्र आणि व्हीआयपी प्रमुख मुकेश सहनी बिहारच्या बाहेर होते. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. राजकारणातील महत्वाच्या व्यक्तींचे कुटुंबिय सुद्धा सुरक्षित नाहीत इतकी बिहारमधील कायदा सुव्यवस्था खराब झाली आहे.

कहर! बिहारमध्ये १५ दिवसांत सात पूल कोसळले, विरोधकांकडून मुख्यमंत्री नितीशकुमार लक्ष

मुकेश सहनी विकासशील इंसान पार्टीचे संस्थापक आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राजदचे तेजस्वी यादव यांच्याबरोबर आघाडी केली होती. निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी तेजस्वी यादव बरोबर अनेक सभांत इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. मुकेश सहनी यांच्या पक्षाने बिहारमधील तीन लोकसभा मतदारसंघात उमेदवार दिले होते. परंतु, या तिन्ही ठिकाणी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

follow us