Bihar News : देशभरात जितिया व्रत मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जात आहे. गंगा नदीसह (Ganga River) देशभरातील नद्यांत स्नान केले जात आहे. मात्र या दरम्यानच बिहार राज्यातून (Bihar News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जितिया व्रता निमित्त गंगा नदीत स्नान करण्यासाठी गेलेल्या लोकांना काळाने गाठले. राज्यभरात अशा 41 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अंघोळ करताना आठ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन महिला आणि सहा लहान मुलींचा समावेश आहे.
‘तिरुपती’नंतर आता ‘यूपी’तील मंदिरात प्रसादाचा वाद.. वाचा बांके बिहारी मंदिराचा पूर्ण रिपोर्ट..
ही घटना जिल्ह्यातील बरुण ब्लॉकच्या इथाट या गावात आणि मदनपूर ब्लॉकच्या कुशा गावात घडली. हे सर्वजण जितिया सणानिमित्त पूजेआधी तलावात स्नान करण्यासाठी गेल्याचे सांगितले जात आहे. सारण जिल्ह्यातही अशीच घटना घडली. येथे आई आणि कुटुंबियांसोबत अंघोळ करण्यासाठी गेलेल्या पाच मुलांचा बुडून मृत्यू झाला. या घटना वेगवेगळ्या भागांतील आहेत. कैमूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी जितिया सणानिमित्त नदी आणि तलावात अंघोळ करण्यासाठी गेलेल्या पाच लोकांचा मृत्यू झाला. एक घटना रामगढ येथील तर दुसरी घटना कल्याणपूर गावातील आहे. तिसरी घटना दादर गावातील आहे. तर चौथी घटना रुपपूर गावातील आहे.
रोहतास जिल्ह्यातील डिहरी पाली पुलाजवळ सोन नदीत स्नान करण्यासाठी गेलेल्या एका तेरा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. वृंदावन परसौनी गावात आई मुलीसह दोन अन्य मुलांचा मृत्यू झाला. कल्याणपूर हद्दीत आणखी तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे.
राजधानी पटनातील बिहटा हद्दीतील अमनाबाद हलकोरिया चक गावात सोन नदीच्या घाटावर बुधवारी गर्दी झाली होती. सणानिमित्त अंघोळ करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. याचवेळी अंघोळीसाठी गेलेल्या आईसह एका चौदा वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाला. त्याच वेळी चार महिलांना त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र पाण्याचा प्रवाह अतिशय वेगात असल्याने मुलीसह चार जण बुडाले.
बिहारमध्ये नवी दोस्ती! नितीशकुमारांचं नेतृत्व चिराग पासवानांनाही मान्य; बैठकीत मोठा निर्णय
यानंतर घाटावर गर्दी जमा झाली. गावातील लोकांनी नदीत उड्या मारून एका जणाला बाहेर काढले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बेपत्ता झालेल्यांचा शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सणाच्या काळातच या घटना घडल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.