Download App

लोकसभेच्या रणांगणात मोदींची हॅट्रिक झाल्यास ‘हे’ 54 शेअर्स गुंतवणुकदारांना करणार मालामाल

BJP च्या विजयाचा ( BJP Victry ) शेअर बाजारावर अत्यंत सकारात्मक परिणाम होणार असल्याचे भाकीत तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

BJP Victory in Loksabha Election will increase Shares Price : सध्या देशभरात 1 जूनला होणाऱ्या लोकसभेच्या ( Loksabha Election ) शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर लागणाऱ्या निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. याच दरम्यान या निवडणुकीतील भाजपच्या विजयाचा ( BJP Victory ) शेअर बाजारावर अत्यंत सकारात्मक परिणाम होणार असल्याचे भाकीत तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. यामध्ये कोणत्या कंपन्यांचे शेअर्स वधारणार ( Shares Price ) आहेत? याबद्दल आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज कंपनी CLSA ने अंदाज वर्तवला आहे.

…तेव्हा कोश्यारी अन् चंद्रकांत पाटलांनी माफी मागितली का? आव्हाडांचा भाजपला थेट सवाल

या कंपनीने वर्तवलेल्या अंदाजानुसार भाजपचे सरकार आल्यानंतर ते बजेट सादर करतील. त्यापूर्वीच जून किंवा जुलैमध्ये भारतातील सरकारी कंपन्या किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स उच्चांक गाठतील. कारण गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अशाच प्रकारे भाजप सरकार आल्यानंतर शेअर बाजार वधारला होता. ज्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सचा मोठा वाटा होता.

‘हे’ शेअर्स वधारणार

भाजपचे सरकार आल्यानंतर शेअर बाजारात नेमके कोणते शेअर्स वाढणार आहेत? याची एक यादी या कंपनीने तयार केली आहे. ज्याला त्यांनी ‘मोदी स्टॉक्स’ असे म्हटले आहे. यामध्ये 54 कंपन्यांचा समावेश आहे. या त्याच कंपन्या आहेत. ज्यातील 90% कंपन्यांनी गेल्या सहा महिन्यात निफ्टीला मागे टाकले आहे. त्यामुळे 2014 आणि 2019 प्रमाणे भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार सत्तेत आल्यास या कंपन्यांचे शेअर्स उच्चांक गाठतील.

Danka Hari Namacha : ‘डंका… हरी नामाचा’ चित्रपटात ‘या’ नामवंत कलाकारांची मांदियाळी

या 54 कंपन्यांमध्ये एल अँड टी, एनटीपीसी, एनएचपीसी, पीएफसी, ओएनजीसी, आयजीएल, महानगर गॅस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, इंडस बँक, अशोक लेलँड, अल्ट्राटेक, बजाज फायनान्स, मॅक्स फायनान्शियल, झोमॅटो, डी मार्ट त्याचबरोबर दूरसंचारक क्षेत्रातील भारतीय एअरटेल, इंडस टॉवर्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांचा समावेश असणार आहे.

मात्र CLSA ने असं देखील म्हटलं आहे की, ही वाढ कमी काळासाठी असेल निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर काही आठवडे ही वाढ दिसेल. त्यानंतर सर्व काही सरकारच्या धोरणांवरच अवलंबून असणार आहे. त्यामुळे परताव्याची घाई असणाऱ्या गुंतवणुकदारांना यामध्ये फायदा होऊ शकतो. असा अंदाज या कंपनीने वर्तवला आहे.

follow us

वेब स्टोरीज