Download App

काँग्रेसवर ब्रिटिशांचा प्रभाव, स्वातंत्र्यानंतर गुलामगिरीची मानसिकता वाढवली, पीएम मोदींचा हल्लाबोल

Narendra Modi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज राज्यसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या धोरणावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, काँग्रेस पक्षावर ब्रिटिशांचा प्रभाव होता. स्वातंत्र्यानंतरही देशात गुलामगिरीची मानसिकता कोणी वाढवली? जर तुमच्यावर इंग्रजांचा प्रभाव नव्हता तर त्यांनी बनवलेला नागरी कायदे का बदलले नाहीत. तुमच्यावर त्यांच्या प्रभाव नव्हता तर ही लाल दिव्याची व्यवस्था इतकी वर्षे का सुरू ठेवली? असे सवाल त्यांनी केले आहेत.

पीएम मोदी पुढं म्हणाले, संध्याकाळी पाच वाजता अर्थसंकल्पाची परंपरा का सुरू ठेवली? जर तुमच्यावर इंग्रजांचा प्रभाव नव्हता तर मग गुलामगिरीच्या खुणा का राहू दिल्या. आज आम्ही सर्वकाही बदलत आहोत. अंदमान-निकोबारवर ब्रिटीश राजवटीच्या खुणा अजूनही का आहेत? अशी टीका त्यांनी केली.

पुन्हा नेहरूंवर हल्लाबोल
पीएम मोदी पुढं म्हणाले की ‘एकदा नेहरूंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी लिहिले होते की, मला कोणतेही आरक्षण नको आहे आणि विशेषत: नोकरीत आरक्षण नको आहे. मी अशा कोणत्याही निर्णयाच्या विरोधात आहे ज्यामुळे अकार्यक्षमतेला चालना मिळेल, ज्यामुळे दुय्यम दर्जाला वाढीला लागेल. असे पत्र पंडित नेहरूंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले आहे. म्हणूनच मी म्हणतो की काँग्रेसचा मूळतः एससी-एसटीला विरोध आहे. बाबासाहेब नसते तर एसटी एससीला आरक्षण मिळाले असते की नाही, अशी शंका आहे, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

संजय राऊत सुट्टी देईनात! CM शिंदेंच्या उपस्थितीत गुंडांचा शिवसेनेत प्रवेश करतानाचा फोटो ट्वीट

काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न का दिला नाही?
पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसने जम्मू-काश्मीरमध्ये आरक्षण लागू होऊ दिले नाही. कलम 370 रद्द केल्यावरच इतक्या दशकांनंतर एसटी-एससी-ओबीसींना अधिकार मिळाले, जे देशातील जनतेला वर्षानुवर्षे मिळत होते, अशी टीका करत ते पुढं म्हणाले भाजपच्या मदतीमुळे बाबासाहेबांना भारतरत्नही मिळाला. काँग्रेसने सीताराम केसरीचे काय केले ते देशाने पाहिले. देशात पहिल्यांदाच एका पक्षाने आदिवासी समाजाच्या महिलेला राष्ट्रपती केले. काँग्रेसचा विरोध वैचारिक नव्हता, त्यांचा विरोध आदिवासी महिलेला होता..

Lok Sabha 2024 : ‘यूपी’त ‘इंडिया’ला धक्का, मोठा नेता साथ सोडणार?; शिवपाल यादवांनी स्पष्टच सांगितलं

follow us