Budget 2024 : फेब्रुवारी 2024 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन अंतरीम बजेट (Budget 2024) सादर करतील. 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या अगोदर केंद्र सरकार त्यांच्या या कार्यकाळातील शेवटचे बजेट (Budget expectations) सादर करणार आहेत. भाजप सरकारचे हे बजेट अंतरिम बजेट असणार आहे. यादरम्यान यावर्षीच्या बजेटमध्ये पर्यटन क्षेत्रासह लक्षद्विपसाठी मोठ्या घोषणांची शक्यता वर्तवली जात आहे.
रोहित पवारांकडून ईडी चौकशीचा राजकीय इव्हेंट; अजित पवार गटाचे टीकास्त्र
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपचा दौरा करून आले. त्यांच्या या दौऱ्याची प्रचंड चर्चा झाली. तसेच या दौऱ्यादरम्यान त्यांनी भारतीय पर्यटन क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न केला. पर्यटकांना भारतीय पर्यटन स्थळ आणि विशेषतः लक्षद्वीपला भेट देण्याचं आवाहन केलं. त्यामुळे यावर्षीच्या बजेटमध्ये पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वाच्या घोषणा होण्याची अपेक्षा बाळगली जात आहे.
‘काहीही हरकत नाही’: मराठा-ओबीसी वादात मध्यस्थी करण्याची आंबेडकरांची ऑफर जरांगेंनी स्वीकारली
यामध्ये लक्षद्वीपमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवर लक्ष केंद्रित केले जाईल. त्याचबरोबर अंदमान निकोबारवर देखील विशेष लक्ष असेल ज्यामध्ये नवीन कॉटेज हाऊस रिसॉर्ट हॉटेल्स यांच्यासाठी इन्सेंटिव्ह दिला जाऊ शकतो. तसेच समुद्री वाहतूक म्हणजे ज्याप्रमाणे मालदीवमध्ये एअरपोर्ट ते आयलँड प्रवासासाठी जेटीज उपलब्ध करून दिल्या जातात. तसंच इन्फ्रास्ट्रक्चर लक्षद्वीपमध्ये निर्माण केलं जाऊ शकतं.
INDIA Alliance : ‘ममतांशिवाय ‘इंडिया’ आघाडी शक्य नाही’; स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेस बॅकफूटवर!
कारण नुकतंच पर्यटन क्षेत्राच्या मुद्द्यावरून भारत आणि मालदीव या दोन देशांमध्ये वातावरण तापलं होतं. त्यामुळे आता भारतीय पर्यटन क्षेत्राच्या विकासावर भर दिला जाऊ शकतो. तसेच फेब्रुवारीमध्ये भाजप सरकार अंतरिम बजेट सादर करणार असल्याने जूनमध्ये पूर्ण कालिक बजेट सादर करताना यामध्ये वाढ केली जाऊ शकते.
लक्षदीप दौऱ्यावर नुकतेच पंतप्रधान मोदींनी कोच्ची लक्षद्वीप द्वीप समूह सबमरीन ऑप्टिकल फायबर कनेक्शन योजनेची सुरुवात केली. त्यातून बेट आणि केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या लक्षद्वीपमध्ये इंटरनेट सुविधा जलद गतीने मिळणार आहे.