Union Budget 2024 : सेन्सेक्स, निफ्टीकडे राहणार सर्वांचेच लक्ष : गत 10 वर्षांमध्ये काय घडले होते?

Union Budget 2024 : सेन्सेक्स, निफ्टीकडे राहणार सर्वांचेच लक्ष : गत 10 वर्षांमध्ये काय घडले होते?

मोदी सरकारचे (Modi government) दुसऱ्या टर्ममधील अखेरचा अर्थसंकल्प अवघ्या आठवड्याभरावर येऊन ठेपला आहे. यंदाचा अर्थसंकल्प (Last budget) हा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे. एक एप्रिल ते 31 जुलै याच कालावधीसाठी हा अर्थसंकल्प असणार आहे. लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर नव्याने सत्तेत येणारे सरकार पुढील कालावधीसाठी जुलै महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. (Last budget of the second term of the Modi government will be presented on February 1 eyes on share market)

मात्र जरी अंतरिम अर्थसंकल्प असला तरीही त्याबाबत बाजारामध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार यांना कोणता दिलासा मिळणार, कोणत्या नवीन घोषणा होणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. याशिवाय उद्योग क्षेत्रालाही खूश करण्यासाठी सरकार कोणत्या घोषणा करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Budget 2024 : ‘स्टार्टअप’ कंपन्यांना मिळणार ‘बूस्टर’? ‘या’ आहेत महत्वाच्या मागण्या

दरम्यान, या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला काय मिळते याकडे जसे नागरिकांचे लक्ष असते तसेच लक्ष तसेच लक्ष गुंतवणूकदारांचेही लागलेले असते. कारण अर्थसंकल्पातील तरतुदींचे पडसाद शेअर मार्केटवरही होत असतात. अनेक वेळा अर्थसंकल्पीय भाषण सुरू झाल्यावर शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी वाढू लागतात तर कधी घसरायला लागतात.पुष्कळ वेळा ते सुरुवातीला वर जातात पण दिवसाच्या शेवटीला पडतात आणि बंद होतात. कधी कधी हे चित्र उलटेही घडते.

आता पुन्हा एकदा अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे शेअर बाजार त्यावर काय प्रतिक्रिया देईल हे त्या दिवशी पाहायचे आहे. पण त्यापूर्वी आपण गेल्या 10 वर्षांत अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारात आनंद झाला की निराशा केली हे आपण पाहू.

पहिला कार्यकाळ :

2014 : मोदी सरकारचे पहिले पूर्ण बजेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे 2014 मध्ये सरकार स्थापन केले. त्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 10 जुलै रोजी संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या होत्या. वैयक्तिक करदात्यांची गुंतवणूक आणि सवलतीची मर्यादा वाढवण्यात आली. पण, त्या दिवशी शेअर बाजारात किरकोळ हलचाल पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स 0.28 टक्क्यांनी घसरत बंद झाला होता.

Budget 2024 : अर्थसंकल्पापूर्वी रेल्वेच्या शेअर्सची गरुडझेप, तेजीचं नेमकं कारण काय?

2015 मध्ये शेअर बाजारात वाढ झाली होती

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 28 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला होता. 2015-16 या आर्थिक वर्षात वित्तीय तूट 3.9 टक्के ठेवण्याचे उद्दिष्ट अर्थमंत्र्यांनी ठेवले होते. शेअर बाजाराला सरकारचा वित्तीय एकत्रिकरणाचा रोडमॅप आवडला होता. त्यामुळे त्या दिवशी सेन्सेक्स 0.48 टक्क्यांनी वाढून बंद झाला.

2016 मध्ये शेअर बाजारात घसरण झाली होती

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 29 फेब्रुवारीला हा अर्थसंकल्प सादर केला होता. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न पाच वर्षांत दुप्पट करण्याची घोषणा केली होती. 2016-17 या आर्थिक वर्षासाठी त्यांनी 3.5 टक्के वित्तीय तुटीचे लक्ष्य ठेवले होते. वित्तीय तुटीचे लक्ष्य शेअर बाजाराला फारसे आवडले नाही. अर्थसंकल्पाच्या दिवशी सेन्सेक्स 0.66 टक्क्यांनी घसरून बंद झाला.

2017 मध्ये शेअर बाजारात कमालीची वाढ झाली

यावर्षीपासून अर्थसंकल्प सादर करण्यासाठी एक फेब्रुवारी ही तारीख कायमस्वरुपीसाठी निश्चीत करण्यात आली. त्यावर्षी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये शेतकरी, तरुण आणि समाजातील दुर्बल घटकातील लोकांसाठी योजना जाहीर करण्यात आल्या. सरकारने वित्तीय तुटीचे लक्ष्य केवळ तीन टक्के ठेवण्याची घोषणा केली होती. शेअर बाजाराला हा अर्थसंकल्प बराच आवडला होता. अर्थसंकल्पाच्या दिवशी मार्केट 1.76 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

2018 मध्ये शेअर बाजारात घसरण झाली

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एक फेब्रुवारी 2018 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. हा त्यांचा शेवटचा अर्थसंकल्प ठरला. या अर्थसंकल्पात एमएसएमई, रोजगाराच्या नवीन संधी आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. सरकारने वित्तीय तुटीचे लक्ष्य 3.3 टक्के ठेवले होते. या अर्थसंकल्पाने शेअर बाजाराची थोडी निराशा झाली. 0.16 टक्क्यांच्या किंचित घसरणीसह मार्केट बंद झाले.

Budget 2024 : गरीबांना अच्छे दिन! कर संकलनातून मिळालेला पैसा; ‘या’ योजनांवर होणार खर्च

2019 : मार्केट 0.59 टक्क्यांनी वाढले 

एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यादिवशी मार्केट 0.59 टक्क्यांनी वाढले होते.

दुसरा कार्यकाळ :

2019 : शेअर बाजार 0.99 टक्क्यांनी घसरला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये दुसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन केले. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 5 जुलै रोजी 2019-20 या आर्थिक वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. त्या दिवशी म्हणजे 5 जुलै रोजी शेअर बाजार 0.99 टक्क्यांनी घसरला होता.

2020 : मध्ये शेअर बाजारात मोठी घसरण

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी रोजी 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. परंतु, हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांच्या आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला. अर्थव्यवस्थेच्या संथ गतीने आधीच निराशा होती. या कारणांमुळे अर्थसंकल्पाच्या दिवशी सेन्सेक्स 2.43 टक्क्यांनी घसरला.

2021 : मध्ये शेअर बाजारात तेजी

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा अर्थसंकल्प शेअर बाजाराला भावला होता. अर्थसंकल्पीय भाषण सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स वाढू लागला. त्यानंतर दिवसभर शेअर बाजारात तेजी राहिली. व्यवहाराच्या शेवटी बाजार सेन्सेक्सच्या पाच टक्क्यांच्या उसळीसह बंद झाला.

2022 : मध्येही शेअर बाजारात वाढ

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी 2022 रोजी सादर केलेला अर्थसंकल्पही शेअर बाजाराला आवडला. या अर्थसंकल्पात त्यांनी विकासाला चालना देण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्या होत्या. तसेच, कोरोना महामारीमुळे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी अनेक गोष्टींची तरतूद केली होती. याचा परिणाम शेअर बाजारांवर झाला. सेन्सेक्स 1.36 टक्क्यांनी वाढून बंद झाला.

2023 मध्ये संमिश्र कल

एक फेब्रुवारी 2023 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान शेअर बाजारात बरीच अस्थिरता होती. पण, व्यवहाराच्या शेवटी शेअर बाजार थोड्या मजबूतीसह बंद झाला. सेन्सेक्स 0.27 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. पण, निफ्टी लाल रंगात बंद झाल होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज