Budget expectations : नोकरदारांना मिळणार दिलासा! बजेटमध्ये स्टॅन्डर्ड डिडक्शनमध्ये होणार ‘एवढी’ वाढ

Budget expectations : नोकरदारांना मिळणार दिलासा! बजेटमध्ये स्टॅन्डर्ड डिडक्शनमध्ये होणार ‘एवढी’ वाढ

Budget expectations : 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या अगोदर केंद्र सरकार त्यांच्या या कार्यकाळातील शेवटचे बजेट (Budget expectations) सादर करणार आहेत. भाजप सरकारचे हे बजेट अंतरिम बजेट असणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन ( Nirmala Sitaraman ) 1 फेब्रुवारीला संसदेमध्ये हे बजेट सादर करतील. त्यासाठी 31 जानेवारीपासून अधिवेशन सुरू होईल. त्यामध्ये बजेट सादर करण्याच्या अगोदर आर्थिक आढावा सादर केला जाईल. यादरम्यान यावर्षीच्या बजेटमध्ये नोकरदारांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ती म्हणजे यावर्षी स्टॅन्डर्ड डिडक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रतीक्षा संपली! लग्न कल्लोळ’ची रिलीज डेट आली समोर, ‘या’ दिवशी पाहायला मिळणार सिनेमा

स्टॅन्डर्ड डिडक्शन हा सर्वात जास्त वसुल केला जाणार कर प्रकार आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाचा पैसा वाचतो. त्यासाठी वेगळी गुंतवणूक करावी लागत नाही. त्यामुळे यावर्षीच्या बजेटमध्ये स्टॅन्डर्ड डिडक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण गेल्या काही वर्षांत ही वाढ करण्यात आलेली नाही. गेल्यावेळी 2019 मध्ये स्टॅन्डर्ड डिडक्शनमध्ये वाढ करण्यात आली होती.

Uddhav Thackeray : ठाकरेंकडून नाशिक ‘फ्रिज’; भुजबळांच्या बालेकिल्ल्यातून मोदींना करणार ‘चेकमेट’

मात्र दुसरीकडे केंद्र सरकारचं हे अंतरिम बजेट असल्याने यावर्षी कोणत्याही मोठ्या घोषणा केल्या जाणार नाही. असं निर्मला सीतारमन यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच अशी माहिती समोर येत आहे की, स्टॅन्डर्ड डिडक्शन वाढून 90 हजारांपर्यंत जाऊ शकतो. सध्या तो 50 हजार आहे. ही वाढ झाली तर ही करदात्यांसाठी ही मोठी बचत मानली जाईल.

स्टॅन्डर्ड डिडक्शन म्हणजे काय?

स्टॅन्डर्ड डिडक्शन म्हणजे केंद्र सरकारकडून उत्पन्नावर कर लावला जातो पण त्यासाठी करपात्र उत्पन्न हे निश्चित केलेला आहे त्यामुळे करपात्र उत्पन्न बाजूला सारून ची रक्कम उरते तिला स्टॅंडर्ड डिडक्शन म्हणतात. पगारदार कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना या स्टॅंडर्ड डिडक्शनचा लाभ मिळतो त्या आधार त्यांना कर सवलत मिळते. तर गेल्या वर्षी सरकारने नवीन कर प्रणालीमध्ये स्टॅंडर्ड डिडक्शन जोडलं. त्यामुळे सध्या जुनी कर प्रणाली आणि नवीन कर प्रणाली दोन्हीमध्ये स्टॅंडर्ड डिडक्शन उपलब्ध आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube