Download App

मोठी बातमी : भारतातील बँकांवर सायबर हल्ला; 300 बँकांच्या ATM, UPI सेवा ठप्प

देशातील जवळपास 300 लहान बँकांना देशाच्या सर्वात मोठ्या पेमेंट नेटवर्कपासून वेगळे करण्यात आले आहे.

Cyber Attack : देशाच्या बँकिंग क्षेत्राला हादरवून सोडणारी धक्कादायक (Cyber Attack) बातमी आली आहे. देशातील बँकांवर मोठा सायबर हल्ला झाला आहे. जवळपास 300 लहान बँकांना देशाच्या सर्वात मोठ्या पेमेंट नेटवर्कपासून वेगळे करण्यात आले आहे. या बँकांना पेमेंट सिस्टमपासून वेगळं करण्यात आल्याचं कारणही समोर आलं आहे. एका अर्थाने ही खबरदारीच घेण्यात आली आहे. अशा प्रकारचा सायबर हल्ला झाल्यानंतर पुढील मोठा धोका टाळण्याच्या उद्देशाने ही कार्यवाही करण्यात आली आहे.

हा सायबर हल्ला बँकांना टेक्नॉलॉजी सेवा देणाऱ्या एका कंपनीवर झाला आहे. यामुळे बँकांचे पेमेंट सिस्टीम बंद पडले आहे. हा हल्ला सी-एज टेक्नॉलॉजीज नावाच्या कंपनीवर झाला आहे. ही कंपनी देशातल लहान बँकांना बँकिंग टेक्नॉलॉजी सिस्टिम उपलब्ध करून देते. रॉयटर्सने या कंपनीकडे प्रतिक्रिया मागितली असती कंपनीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. भारतीय रिजर्व्ह बँकेनेही यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पेमेंटवर देखरेख ठेवणारी संस्था आहे. एनपीसीआयने काल रात्री एक निवेदन प्रसिद्ध केले. संस्थेने सी एज टेक्नॉलॉजी कंपनीला एनपीसीआय संचलित पेमेंट व्यवस्थेपासून बाजूला केले आहे. सी एजद्वारे सेवा मिळवणाऱ्या बँकांचे ग्राहक या काळात बँकांच्या पेमेंट प्रणालीचा लाभ घेऊ शकत नाहीत. यानंतर देशभरातील अनेक ग्राहकांना एटीएममधून पैसे काढता येत नाहीत. तसेच मोबाइलद्वारे ऑनलाइन पेमेंट करणेही अशक्य झाले आहे.

मोठी बातमी : सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर सायबर हल्ला; नागरिकांची माहिती चोरण्याचा प्रयत्न

एका रेग्युलेटरी अथॉरिटी अधिकाऱ्याने सांगितले की देशातील जवळपास तीनशे बँकांना पेमेंट सिस्टिमपासून वेगळे करण्यात आले आहे. या हल्ल्याचा परिणाम जास्त होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. यामध्ये लहान बँका मोठ्या संख्येने आहेत. देशातील बँकांचा विचार केला तर हे प्रमाण फक्त 0.5 टक्के इतकेच आहे.

भारतात जवळपास दीड हजार सहकारी आणि क्षेत्रीय बँका आहेत. या बँकांच्या संचालन मोठ्या शहरांच्या बाहेरून केले जाते. यातील काही बँकांवर परिणाम झाला आहे का याची माहिती घेण्यासाठी एनपीसीआय कडून ऑडीट केले जात आहे. बँकिंग क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले की रिजर्व्ह बँक (Reserve Bank of India)आणि सायबर अधिकाऱ्यांनी मागील काही दिवसांपूर्वी भारतीय बँकांना सायबर हल्ल्यांबाबत इशारा दिला होता.

कोल्हापुरातील सायबर चौकात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना चिरडले

follow us