LPG Prices from February 1 : देशाचा अर्थसंकल्प आज सादर होणार (LPG Prices) आहे. या अर्थसंकल्पापू्र्वी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. गॅस सिलिंडरच्या दरात सलग दुसऱ्या महिन्यात घट झाली आहे. ही दर कपात कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या दरात झाली आहे. IOCL च्या वेबसाइटवर दर कमी झाल्याचे दिसत आहे. मागील दोन महिन्यांतील दर कपातीचा यात समावेश केला तर यात 20 रुपयांपेक्षा जास्त घट झाली आहे. घरगुती गॅसचे दर मात्र जैसे थे राहिले आहेत. फेब्रुवारी महिन्यातही घरगुती गॅस ग्राहकांना मिळालेला नाही.
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सलग दुसऱ्या महिन्यात घट झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी दिल्लीत 7 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे आता दिल्लीत 19 किलोची कमर्शिअल गॅस सिलिंडर 1797 रुपयांना मिळत आहे. कोलकाता शहरात व्यावसायिक गॅसच्या दरात चार रुपयांची कपात झाली आहे. येथे आता गॅस टाकी 1907 रुपयांना मिळेल. मुंबई आणि चेन्नई या दोन शहरांत गॅस टाकीच्या किंमतीत 6.5 रुपये घट झाली आहे. त्यामुळे मुंबईत 1749.50 रुपये आणि चेन्नईत 1959.50 रुपयांना गॅस टाकी मिळत आहे.
महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ; वाचा नवीन दर
मागील दोन महिन्यांचा विचार केला तर दिल्ली आणि मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडर 21.5 रुपयांनी स्वस्त झाले आहे. कोलकाता शहरात 20 तर चेन्नईत 21 रुपयांची घसरण झाली आहे. ही दरवाढ फक्त कमर्शिअल गॅसच्या बाबतीत झाली आहे. घरगुती गॅसचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे व्यावसायिक गॅसचा वापर करणारे हॉटेल व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते यांना झटका बसला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात खाद्यपदार्थांचे दर वाढू शकतात. नवे दर IOCLच्या वेबसाइटवर अपडेट केले आहेत. व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ झाली आहे. मागील काही महिन्यांपासून कमर्शिअल गॅस सिलिंडरचे दर सातत्याने कमी जास्त होत आहेत.
या दरवाढीतून घरगुती गॅसधारकांना दिलासा मिळाला आहे. या गॅसच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. काही महिन्यांपासून घरगुती गॅसच्या दरात वाढ झालेली नाही. 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडर मागील महिन्यातील दरावरच मिळत आहे. दिल्लीत 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये तर चेन्नई 818.50 रुपये या दरांत घरगुती गॅस मिळत आहे.
ग्राहकांना दिलासा! LPG सिलेंडरच्या दरात 32 रुपयांची कपात, चेक करा नवीन दर