Download App

लोकसभा प्रचाराचा रणसंग्राम संपला; अखेरच्या टप्प्यात 8 राज्यांमध्ये उद्या मतदान

लोकसभे निवडणुकीसाठी उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान होत आहे. यामध्ये एकून आठ राज्यांमध्ये हे मतदान होणार आहे.

Lok Sabha elections last phase : गेली दोन महिन्यांपासून सुरू असलेला लोकसभा संग्रामातील उद्या शेवटचा दिवस. देशभारत पाच वर्षांनी लोहाणार मतदानाचा उत्सव म्हणजे लोकशाहीचा उत्वच. यावेळी लोकसभा निवडणूक ही सात टप्प्यांमध्ये घेण्यात आली. त्यातील सातवा म्हणजे शेवटचा टप्पा उद्या होत आहे. (Lok Sabha elections) त्यामुळे लोकसभेसाठी देशभरात सुरू असलेला प्रचाराचा धुराला आता बसला आहे. उद्या  सात राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील एकूण ५७ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. (last phase) निवडणुकीच्या या अंतिम टप्प्यात 904 उमेदवार रिंगणात आहेत.

सावरकरांविरोधात केलेलं वक्तव्य अंगलट? राहुल गांधींना पुणे सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

यामध्ये पंजाबमधील सर्व जागांचा समावेश आहे. येथे सर्व १३ आणि हिमाचल प्रदेशातील सर्व चार जागांसाठी मतदान होणार आहे. त्याचबरोबर चंडिगड या एका केंद्रशासित प्रदेशातही उद्याच मतदान होणार आहे. त्याशिवाय ओडिशा विधानसभेच्या ४२ जागांसाठीही मतदान होणार आहे. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातही उद्याच मतदान होणार आहे. हिमाचल प्रदेशातील मंडीतील भाजप उमेदवार अभिनेत्री कंगना राणौत, पंजाबमधील भंटिडा मतदारसंघातील शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत कौर, काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह हे महत्वाचे उमेदवार रिंगणात आहेत.

मोदींचं बोलणं ऐकून हसू येतं; महात्मा गांधीवर केलेल्या विधानावरुन खर्गेंचा मोदींना टोला

वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (भाजप) विरुद्ध अजय राय (काँग्रेस) निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात रिंगणात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 आणि 2019 मध्ये वाराणसी मतदारसंघातून विजयी झाले आहेत. आता ते तिसऱ्यांदाही या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर, अजय राय पूर्वी भाजपचे नेते होते. परंतु, 2012 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

       कुठे मतदान?

 

follow us