Download App

Onion Export Ban : शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण ! कांदा निर्यातबंदी हटवलीच नाही

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Central Goverment Onion Export Ban : कांदा निर्यातबंदी केंद्र सरकारने (Central Goverment) हटविल्याच्या बातम्या दोन दिवसांपूर्वी आल्या होत्या. पण आता यावर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आहे. कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban) 31 मार्चपर्यंत कायम राहणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. निर्यातबंदी हटविण्यात आल्याच्या वृत्तामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु आता सरकारच्या स्पष्टीकरणामुळे या आनंदावर विरजण पडले आहे. परंतु आता या मुद्द्यावर विरोधक हे सत्ताधाऱ्यांवर आक्रमक होतील. विशेष म्हणजे भाजपच्या खासदारांनी कांदा निर्यातबंदी उठविल्याबाबत माहिती दिली होती.

येत्या दोन महिन्यांत लोकसभा निवडणुका होणार आहेत. देशांतील कांद्याच्या किंमती नियंत्रित राहण्यासाठी 31 मार्चनंतरही ही बंदी उठविण्याचे शक्यता कमी आहे. यंदा रब्बी हंगामात कांद्याची लागवड कमी झालेली आहे. त्यामुळे उत्पादकाही घटनाची शक्यता आहे. त्यामुळे निर्यातबंदी उठविण्याची शक्यता कमीच आहे. निर्यातबंदी न उठविल्यास महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, पुणे, सोलापूर या जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

पुण्यात अकराशे कोटींचे ड्रग्ज जप्त; देशभरात ‘एमडी’चा सप्लाय, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय

केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी पीटीआयशी बोलताना कांदा निर्यातबंदी हटविण्यात आली नसल्याचे मंगळवारी सांगितले. निर्यातबंदी 31 मार्च 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. कारण देशात कांद्याचा साठा ठेवायचा आहे. त्यामुळे किंमती नियंत्रणात ठेवण्यात मदत होणार आहे. 8 डिसेंबर 2023 रोजी सरकारने 31 मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातलीहोती.

सागरिका घोष यांच्या खासदारकीने राजदीप सरदेसाईंची संपत्ती उघड; डोळे फिरवणारी कोट्यावधींची कमाई


लगेच घाऊक बाजारात किंमती वाढल्या

कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याच्या वृत्तानंतर लगेच घाऊक कांद्याच्या बाजारपेठेत किंमती वाढल्या होत्या. देशातील सर्वात मोठा नाशिकमधील लासलगाव बाजार समितीत कांद्याचे भाव चाळीस टक्कांनी वाढले होते. क्विटंलमागे हा तर अठराशे रुपये झाला होता. त्यामुळे कांदा उत्पादकांना त्याचा थेट फायदा होऊ लागला होता.

भाजप खासदारांकडून गाजावाजा

निर्यातबंदी उठविल्याबाबत अधिकृतपणे केंद्राकडून काहीच सांगण्यात आले नव्हते. पण नाशिकमधील केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार आणि अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गाजावाजा केला. तर खासदारांना निर्यातबंदी उठविले असल्याचे दुजोरा दिला होता. त्यामुळे कांदा उत्पादन जास्त असलेल्या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. काही दिवसात रब्बी हंगामाचा कांद्याला चांगला भाव मिळेल, असे कांदा उत्पादकांना वाटत होते.

follow us

वेब स्टोरीज