सागरिका घोष यांच्या खासदारकीने राजदीप सरदेसाईंची संपत्ती उघड; डोळे फिरवणारी कोट्यावधींची कमाई
नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार, न्यूज अँकर राजदीप सरदेसाई यांच्या पत्नी, ज्येष्ठ पत्रकार सागरिका घोष यांची तृणमूल काँग्रेसच्या वतीने राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. येत्या तीन एप्रिलपासून त्यांचा कार्यकाळ सुरु होणार आहे. एक अभ्यासू चेहरा म्हणून घोष यांना ओळखले जाते. दुसऱ्या बाजूला घोष यांच्या निवडीनंतर त्यांच्यासह पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याही संपत्तीचा आकडा समोर आला आहे. (After the election of Sagarika Ghosh as Rajya Sabha MP, the wealth figure of her along with journalist Rajdeep Sardesai has come to light)
सागरिका घोष आणि राजदीप सरदेसाई यांच्या नावे असलेली मालमत्ता :
सागरिका घोष यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, 2019 मध्ये सागरिका घोष यांची वार्षिक कमाई सुमारे 40 लाख रुपये होती. 2020 मध्ये 38 लाख इतकी त्यांची वार्षिक कमाई होती. 2021 पासून त्यांच्या कमाईत घसरण झाली. 2021 मध्ये दहा लाख, 2022 मध्ये 14 लाख आणि 2023 मध्ये ती 17 लाखांवर त्यांची कमाई होती.
महादेव जानकर अन् उद्धव ठाकरेंचा एकत्र येण्याचा प्लॅन? परभणीत बंडू जाधवांचे तिकीट संकटात
राजदीप सरदेसाई यांची संपत्ती सध्या कमालीची चर्चा आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, 2019 मध्ये सरदेसाई यांची वार्षिक कमाई 4 कोटी 55 लाख रुपये होती. 2020 मध्ये चार कोटी 47 लाख रुपये अशी कमाई होती. कोविड-19 या वर्षांमध्ये त्यांची कमाई काहीशी घसरली होती पण ते कोट्यांवधी रुपये कमावत होते. 2021 मध्ये त्यांची कमाई दोन कोटी 83 लाख रुपये होती आणि 2023 मध्ये पुन्हा 3 कोटी 54 लाखांवर गेले.
मोठी बातमी! मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण; विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर
याशिवाय राजदीप सरदेसाई यांच्याकडे म्युच्युअल फंड, स्टॉक्स आणि बाँड्समध्ये जवळपास 25 कोटी रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्रातून दिसून येते. सोबतच, 2008 मध्ये या दोघांनी सुमारे 25 कोटी रुपयांना खरेदी केले होते. हे घर सागरिका घोष यांच्या नावावर आहे. आज त्याची किंमत सुमारे 49 कोटी रुपये आहे.