विरोधकांकडून वक्फच्या नावाखाली लोकांना भडवले जातेय, मुर्शिदाबाद हिंसाचारावरून CM योगींचा निशाणा

विरोधकांकडून वक्फच्या नावाखाली लोकांना भडवले जातेय, मुर्शिदाबाद हिंसाचारावरून CM योगींचा निशाणा

Yogi Adityanath : वक्फ कायद्याच्या (Waqf Act) विरोधात पश्चिम बंगालमध्ये (Bengal निदर्शने सुरू आहेत. बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात हिंसाचार उसळला असून या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाला आणि लाखो कोटींची मालमत्ता नष्ट झाली. यावरूनच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. विरोधक वक्फच्या नावाखाली हिंसाचार घडवत आहेत, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली होती.

विदेशी पर्यटकाला मराठीतून शिव्या देण्यास भाग पाडलं; हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांत गुन्हा दाखल… 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी डॉ. भीमराव आंबेडकर सन्मान समारंभाला संबोधित करताना म्हटले की, बांगलादेशातील हिंसाचाराच्या घटना सर्वांसमोर आहे. तीन वर्षांपूर्वी राज्यसभा खासदार आणि उत्तर प्रदेशचे माजी डीजीपी ब्रिजलाल यांनी एक पुस्तक लिहिले होतं. ते पुस्तक दलित नेत्यांच्या तुलनात्मक अभ्यासावर आधारित होते. एका बाजूला बाबासाहेब आंबेडकर होते आणि दुसऱ्या बाजूला योगेंद्र नाथ मंडल होते… योगेंद्र नाथ मंडल यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला होता, पण ते तिथे एक वर्षही राहू शकले नाहीत.

विदेशी पर्यटकाला मराठीतून शिव्या देण्यास भाग पाडलं; हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांत गुन्हा दाखल… 

ते पुढे म्हणाले, योगेंद्र नाथ मंडल यांच्या कृत्यांचे परिणाम बांगलादेशी हिंदू अजूनही भोगत आहेत. बांगलादेशात राहणारे सर्व छळलेले आणि पीडित हिंदू दलित आहेत. काँग्रेस, सपा आणि तृणमूल काँग्रेस या कोणत्याही राजकीय पक्षाने त्यांच्या (बांगलादेशी हिंदूंच्या) बाजूने आवाज उठवला नव्हता. फक्त भाजपने त्यांच्या बाजूने आवाज उठवला. आपल्याला प्रत्येक हिंदूचे रक्षण करावे लागेल. म्हणूनच वक्फ कायदा बनवण्यात आला, असं योगी म्हणाले.

ते म्हणाले, मात्र, वक्फ कायद्यावरून विरोधकांकडून हिंसाचार भडकवला जात आहे.
वक्फच्या नावाखाली जमीन लुटण्यात आली, लाखो एकर जमीन बळकावण्यात आली आणि आता हिंसाचार घडवला जात आहे. मुर्शिदाबादमध्ये गरीब हिंदूंना घराबाहेर ओढून मारले जात आहे. या कायद्याचा सर्वाधिक फायदा हेच गरीब लोक घेणार  होते.

विरोधकांवर निशाणा साधताना योगी म्हणाले, काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस सारखे पक्ष केवळ व्होट बँकेचे राजकारण करत आहेत. त्यांना भीती आहे की, जर गरिबांना उंच इमारती मिळाल्या तर त्यांची व्होट बँक नष्ट होईल. म्हणूनच हे लोक हिंसाचार भडकावत आहेत. दलित आणि वंचितांच्या जमिनीवर कब्जा करणाऱ्यांचे विरोधी पक्षांशी थेट संबंध आहेत, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

सीएम योगी म्हणाले की, हे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात आणि औरंगजेब किंवा जिन्ना सारख्या लोकांचे कौतुक करतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube