विदेशी पर्यटकाला मराठीतून शिव्या देण्यास भाग पाडलं; हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांत गुन्हा दाखल…

विदेशी पर्यटकाला मराठीतून शिव्या देण्यास भाग पाडलं; हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांत गुन्हा दाखल…

Sinhagad Fort Viral Video : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या न्यूझीलंडमधील पर्यटकाला मराठीतून शिव्या देण्यास भाग पाडणाऱ्या हुल्लडबाज तरुणांवर (Sinhagad Fort Viral Video) पुणे ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं. हा विदेशी पर्यटक ब्लॉगमधून सिंहगड किल्ल्याची माहिती देत असतानाच तरुणांनी त्याला मराठीतून शिवीगाळ करण्यास भाग पडलं. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच संतापाची लाट उसळत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील अन् आजोबांच्या समाधीस्थळाचा जिर्णोद्धार करा, रईस शेख यांचे CM फडणवीसांना पत्र

न्यूझीलंडचा पर्यटक ल्यूक असेुन त्याने ल्यूक द एक्सप्लोरर या त्याच्या युट्यूब चॅनेलवर आपला व्हिडिओ अपलोड केला. एक तासांच्या व्हिडिओमध्ये ल्युकने सिंहगड सर करताना लोकांशी झालेला संवाद आणि त्याला आलेला अनुभव शेअर केलायं.

कल्याण बलात्कार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीची आत्महत्या, तुरूंगातच घेतला गळफास

“दीस फोर्ट इन इंडिया इज इन्सेन” या शीर्षकाखाली ल्युकने सदर व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये काही तरूणांचे टोळके ल्युकला गाठून त्याला अपशब्द बोलण्यास भाग पाडतात. हे तरूण छत्रपती संभाजीनगर मधून आले असल्याचे सांगतात. ल्युकने इतरांना पाहून मराठीतून अपशब्द वापरावेत, यासाठी तरुणांचे टोळके ल्युकला उकसवत असल्याचे व्हायरल व्हिडीओत दिसत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या