Download App

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, CRPF करणार व्हीआयपींची सुरक्षा, एनएसजी कमांडोंची ‘सुट्टी’!

CRPF Commandos VIP Security : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत देशातील व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एनएसजी कमांडोच्या

  • Written By: Last Updated:

CRPF Commandos VIP Security : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत देशातील व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेसाठी (VIP Security) तैनात असलेल्या एनएसजी कमांडोच्या जागी सीआरपीएफचे जवान तैनात करण्याचे आदेश दिले आहे. पुढील महिन्यापासून देशातील व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफचे जवान सांभाळणार आहे.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार, एनएसजी कमांडोना सर्व व्हीआयपी सुरक्षा कर्तव्यांवरून काढून टाकण्यात आले आहे आणि त्यांच्या जागी सीआरपीएफचे जवान नोव्हेंबरपासून सुरक्षेची जबाबदारी सांभाळतील. तर एनएसजी कमांडोचा वापर केवळ दहशतवादविरोधी कारवायांसाठी करण्यात येणार आहे. असं केंद्र सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे.

माहितीनुसार देशात सध्या 9 व्हीआयपी आहेत ज्यांना झेड-प्लस श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे आणि एनएसजीचे ब्लॅक कॅट कमांडो त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात मात्र आता त्यांच्या जागी सीआरपीएफचे जवान तैनात राहणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, संसदेच्या सुरक्षेतून निवृत्त झालेल्या सीआरपीएफचे जवानांना विशेष प्रशिक्षण देऊन व्हीआयपी सुरक्षा शाखेत पाठवण्यात आले आहे. त्यासाठी नवीन बटालियनही तयार करण्यात आली असून, हे जवान व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहे.

या लोकांना झेड प्लस सुरक्षा मिळाली आहे

माहितीनुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बसपा सुप्रीमो मायावती, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, सर्बानंद सोनोवाल, रमण सिंह, गुलाब नबी आझाद, फारूक अब्दुल्ला, चंद्राबाबू नायडू यांना झेड प्लस सुरक्षा आणि एनएसजी सुरक्षा मिळाली आहे.

ऐन दिवाळीतच राडा, रॉयल एनफिल्डची पहिली इलेक्ट्रिक बाइक ‘या’ दिवशी होणार लाँच

follow us