Champai Soren News : झारखंडच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ होऊ शकते झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणाच्या तपासाचा एक भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी रांचीमध्ये सोरेन यांना अटक केली आहे. तर दुसरीकडे चंपई सोरेन (Champai Soren) यांनी राज्यपालांना सरकार स्थापनेसाठी पत्र देऊन मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे.
कायदा ढाब्यावर बसवून शिवसेना चोरांच्या हाती दिली; नार्वेकरांचं नाव घेत ठाकरेंची जळजळीत टीका
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना चंपाई सोरेन यांना पाठिंबा देणारे पत्र दिले आहे. त्यामुळे आता चंपई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री होतील. झारखंडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाआघाडीचे आमदार हैदराबादला रवाना होण्याच्या तयारीत आहेत. रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर दोन चार्टर्ड विमाने तयार आहेत. या विशेष विमानाने झामुमो आणि काँग्रेसचे आमदार हैदराबादला जाणार असल्याची माहिती आहे. चंपाई सोरेन आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आलमगीर आलम रांचीमध्येच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे दोन्ही नेते हैदराबादला जाणार नाहीत.
आमचं हिंदुत्व चूल पेटवणारं अन् तुमचं घरं पेटवणारं; उद्धव ठाकरेंनी भाजपचं हिंदुत्वच काढलं
आमदारांनी भरलेली बस रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर पोहोचली आहे. काही वेळापूर्वी आमदारांनी भरलेली बस सर्किट हाऊस सोडून विमानतळाकडे निघाली होती. 12 सीटर आणि 33+ सीटर बसेस असल्याचं सांगण्यात येत आहे. या दोन बसमधून महाआघाडीचे सर्व आमदार प्रवास करत आहेत. हैदराबाद विमानतळावरही बसेस उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते. आमदार विमानतळावर पोहोचताच त्यांना हॉटेलमध्ये हलवण्यात येणार आहे.
राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्यासोबत पक्षाच्या आमदारांच्या बैठकीबाबत झामुमोचे प्रवक्ते सुप्रियो भट्टाचार्य म्हणाले की, आम्ही उद्या शपथविधी सोहळ्याबाबत सविस्तर माहिती देऊ. आम्हाला सभागृहात 47 आमदारांचा पाठिंबा आहे.
त्याचवेळी हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर भाजपने संधी शोधण्यास सुरुवात केल्याचेही वृत्त आहे. याशिवाय राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही चर्चा आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
चंपई सोरेन यांना कोणत्या आमदारांचा पाठिंबा
झारखंड विधानसभेची एकूण सदस्य संख्या 81 आहे. यामध्ये बहुमताचा आकडा 41 आहे. ज्या पक्षाला 41 आमदारांचा पाठिंबा मिळेल तो पक्ष सरकार स्थापन करेल. चंपई हे बुधवारी 43 आमदारांसह राजभवनात गेले होते. त्यांना 47 आमदारांचा पाठिंबा आहे. या 47 आमदारांमध्ये जेएमएमचे 29, काँग्रेसचे 17, आरजेडीचे 1 आणि सीपीआयच्या 1 आमदारांचा समावेश आहे.