Download App

Chhattisgarh Election : छत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान नक्षलवाद्यांशी चकमक

Chhattisgarh Election: छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या (Chhattisgarh Election 2023) पहिल्या टप्प्यात आज मतदान होत आहे. मतदानादरम्यान अनेक ठिकाणांहून नक्षलवादी हल्ल्याची माहिती येत आहे. सुकमा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये अनेक जवान जखमी झाल्याच्या माहिती समोर येत आहे.

छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात 20 जागांवर मतदान होत आहे. या 20 जागांवर अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत छत्तीसगडमध्ये 44.55 टक्के मतदान झाले आहे.

छगन भुजबळांच्या नेतृ्त्वात OBC नेते एकवटले; 17 नोव्हेंबरपासून शिंदे सरकारविरोधात एल्गार

दरम्यान, छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील बांदे पोलीस स्टेशन परिसरात नक्षलवादी आणि बीएसएफ आणि डीआरजी पथकांमध्ये चकमक सुरू झाली. घटनास्थळावरून एके 47 जप्त करण्यात आली आहे. परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. काही नक्षलवादी जखमी किंवा ठार झाल्याची शक्यता छत्तीसगड पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Maratha Reservation : ‘यापैकी’ एका कागदावर नोंद सापडल्यास मिळणार ‘कुणबी’ प्रमाणपत्र

कांकेरचे एसपी दिव्यांग पटेल यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे. कांकेरमध्ये गोळीबार करताना नक्षलवाद्यांनी एके-47 रायफलचाही वापर केला आहे. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

कांकेरची ही घटना वांदे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मतदान केंद्रांभोवती सुरक्षा दलाचे पथक वर्चस्वासाठी निघाले असताना घडली. दुपारी एकच्या सुमारास सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.

दुसरीकडे सुकमा आणि नारायणपूरमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. सुकमा येथे काही जवान जखमीही झाले आहेत. दुसरीकडे, सुकमाच्या ताडमेटला आणि दुलेट दरम्यान सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. कोब्रा 206 च्या जवानांसोबत चकमक सुरू आहे. मीनपा येथील मतदान कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्यासाठी जंगलात सैनिक तैनात करण्यात आले होते. ही चकमक सुमारे 20 मिनिटे चालली. या घटनेत काही जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Tags

follow us