Download App

लोकसभेच्या निकालावर चीनची देखील नजर, जिनपिंग म्हणाले, ‘मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर…’

आता चीनने देखील एक्झिट पोलवर थेट प्रतिक्रिया दिली. मोदी सरकार पुन्हा एकदा भारतात सत्तेवर येऊ शकते, असं चीनने म्हटलं.

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) निकाल येण्यास अवघे काही तास शिल्लक राहिलेत. या निकालाकडे संपूर्ण देशाचं नव्हे तर जगाचं लक्ष लागलं आहे. एक्झिट पोलमध्ये (Exit polls) देशात पुन्हा एकदा भाजपला (BJP) बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आता चीनने देखील एक्झिट पोलवर थेट प्रतिक्रिया दिली. मोदी सरकार पुन्हा एकदा भारतात सत्तेवर येऊ शकते, असं चीनने म्हटलं.

धक्कादाय घटना; आयएएस दाम्पंत्याच्या मुलीची सुसाईट नोट लिहून ठेवत आत्महत्या 

काही एक्झिट पोल एनडीएला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील असा कौल आहे. बहुतेक एक्झिट पोलने पंतप्रधान मोदींच्या विजयाची हॅट्रिक वर्तवली आहे. याचा अर्थ पुन्हा एकदा मोदींचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. दरम्यान, चीनचे अधिकृत वृत्तपत्र ग्लोब्ल टाईम्सने भाजप आणि मोदींच्या संभाव्य विजयावर प्रतिक्रिया दिली. या वृत्तपत्रात एक लेख लेख प्रकाशित झाला आहे. त्यात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर दोन्ही देशातील संबंध सुधारतील, असं म्हटलं.

पुढं लिहिलं की, मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सीमांवर होणाऱ्या चकमकी कमी होतील आणि भारताच्या परराष्ट्र धोरणात आणखी सुधारणा होईल. दोन्ही देशामध्ये मतभेद दूर करण्यासाठी खुली चर्चा होईल. तसेच संवाद कायम राहिले, अशी आशा ग्लोबल टाइम्सने व्यक्त केली आहे. मोदी आणि त्यांचा पक्ष तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यास माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा सत्तेत येणारे ते दुसरे पंतप्रधान असतील, असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, ग्लोबल टाईम्सच्या लेखात पंतप्रधानांनी अमेरिकेत दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ दिला आहे. त्यात मोदींनी भारताचे चीनसोबत चांगले संबंध आहेत, असं म्हटलं होतं. मात्र, दोन्ही देशातील सीमेवरून होत असलेल्या संघर्षावर उपाय शोधावा लागेल, असं विधान केलं होतं. त्याचाही हवाला लेखामध्ये दिला आहे.

follow us