धक्कादायक घटना; आयएएस दाम्पत्याच्या मुलीची सुसाईट नोट लिहून ठेवत आत्महत्या
IAS officer Daughter Committed Suicide In Mumbai : एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयएएस दाम्पत्य विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी यांची मुलगी लिपी रोस्तोगीगे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. (Suicide) तीने मंत्रालयासमोरील सुनीती इमारतीत आत्महत्या केली. दरम्यान, लिपीने सुसाईट नोट लिहून ठेवली आहे. त्यामध्ये तीने कुणालाही दोषी न धरता शैक्षणिक पातळीवर जे यश हव आहे ते मिळत नसल्याने हे पाऊल उचलत असल्याचं म्हटलं आहे. विषेश म्हणजे, लिपी रस्तोगीचे आई आणि वडिल दोघंही आयएएस अधिकारी आहेत. (Committed Suicide) त्यामुळे या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
तपास सुरू
ज्या इमारतीत ही घटना घडली तिथं आयएएस अधिकारी आणि काही मंत्र्यांची घरं आहेत. विकास रस्तोगी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणचे सचिव आहेत. तर, राधिका रस्तोगी चलन विभागात सचिव या पदावर कार्यरत आहेत. लिपी रस्तोगी ही वकिलीचं शिक्षण घेत होती. अभ्यासात गती नसल्याची चिंता तिला सतावत होती अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. कफ परेड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
सुसाइड नोटमध्ये काय?
लिपी हिनं पहाटे चार वाजताच्या सुमारात इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. जीटी रुग्णालयात तिला नेण्यात आलं होतं. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषीत केलं. पोलिसांनी तिच्या खोलीचा तपास केला असता एक सुसाइड नोट सापडली आहे. त्यात माझ्या मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार धरू नये असं लिहिल्याचं समोर आलं आहे. अनैसर्गिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केली आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे.