Download App

China On India Pakistan War : आम्ही पाकिस्तानसोबत, भारताविरुद्ध चीनचा पाकिस्तानला पाठिंबा  

China On India Pakistan War : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान (India- Pakistan War) दरम्यान तणाव

China On India Pakistan War : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान (India- Pakistan War) दरम्यान तणाव वाढला आहे. 7 मेपासून दोन्ही बाजूने हवाई हल्ले करण्यात येत आहे. तर 10  मे रोजी अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या मध्यस्थीने युद्धबंदीसाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शवली होती मात्र अवघ्या तीन तासांमध्ये पाकिस्तानकडून याचा उल्लंघन केल्याने भारताने देखील पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  लष्कराला प्रत्युत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री (Vikram Misri) यांनी देिली आहे. तर दुसरीकडे चीनने पाकिस्तानला पाठिंबा जाहीर केला आहे.

चीनने काय म्हटले?

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी (Wang Yi) यांनी सांगितले की, त्यांचा देश पाकिस्तानचे “सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य” राखण्यासाठी त्याच्यासोबत उभा राहील. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, वांग यी यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेदरम्यान या गोष्टी सांगितल्या. यासोबतच, परराष्ट्र कार्यालयाकडून असेही म्हटले आहे की त्यांनी पुष्टी केली की चीन, पाकिस्तानचा सदाबहार धोरणात्मक सहकारी भागीदार आणि कट्टर मित्र म्हणून, पाकिस्तानचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य राखण्यासाठी त्याच्यासोबत खंबीरपणे उभा राहील.

तर उपपंतप्रधान दार यांनी यूएईचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद यांच्याशीही चर्चा केली, ज्यांनी पाकिस्तान आणि भारत यांच्यातील युद्धबंदी कराराचे स्वागत केले. दार यांनी तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हकान फिदान यांच्याशीही चर्चा केली आणि त्यांना या प्रदेशातील सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली.

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, तीन राज्यांमध्ये ब्लॅकआउट; एअर डिफेन्स सिस्टिम सक्रिय 

तर दुसरीकडे अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेचा परिणाम म्हणून भारत आणि पाकिस्तानने “पूर्ण आणि तात्काळ” युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी जाहीर केले होते.

follow us