Download App

मोठी बातमी ! जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी, 10 जणांचा मृत्यू, बचाव कार्य सुरू

जम्मू काश्मीरच्या किश्तवाड येथे ढगफुटी (Cloudburst) झाल्याची घटना समोर आली आहे. या नैसर्गिक आपत्तीत १० जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Written By: Last Updated:

Cloudburst in Jammu Kashmir : जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) किश्तवाड येथे ढगफुटी (Cloudburst) झाल्याची घटना समोर आली. या नैसर्गिक आपत्तीमुळे एकच हाहाकार उडाला आहे. चसौती या गावात ही ढगफुटीची घटना झाली आहे. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जातेय.

मोठी बातमी ! जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी, 10 जणांचा मृत्यू, बचाव कार्य सुरू 

गुरुवारी दुपारी १२:३० वाजता किश्तवाड जिल्ह्यातील पद्दार उपविभागात ढगफुटी झाली. त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तथापि, प्रशासनाने अद्याप मृतांची संख्या निश्चित केलेली नाही. तर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, चशोती भागात ढगफुटी झाली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितले की, प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे आणि बचाव पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. या घटनेनंतर झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जात आहे.

दरम्यान, पद्दारच्या ज्या चशौती गावात ढगफुटी झाली, ते ठिकाण माचैल माता मंदिराचे मूळ केंद्र असून धार्मिक यात्रेसाठी येथे मोठ्या संख्येने लोक जमले होते. शिवाय, अनेक लोक या गावात राहतात. याशिवाय पर्यटकही मोठ्या संख्येने येत असतात. अशातच ढगफुटी झाल्याने एकच हाहाकार उडाला आहे.

मध्यरात्री मुलीचा मृत्यू, कुटुंबियांनी पहाटे परस्परच उरकला अंत्यविधी; जालन्यातली धक्कादायक घटना 

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला. किश्तवाडमधील ढगफुटीच्या घटनेने मी दुःखी आहे. मी शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो, असं त्यांनी म्हटलं.

तसेच जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना सिन्हा यांनी केली आहे. त्यांनी सिव्हील, पोलिस, सैन्य, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ अधिकाऱ्यांना बचाव आणि मदत कार्याला मदत करण्याचे आणि पीडितांना शक्य ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिलेत.

follow us