कर्नाटकात जलाशयांची पातळी घटल्यानंतर कर्नाटकात महाराष्ट्रातून पाणी सोडण्यात येतं. यंदा कर्नाटकच्या जलाशयांतील पाण्याची पातळी घटल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाणी सोडण्याची विनवणी केली आहे. कर्नाटकला 5 टीएमसी पाणी सोडण्याबाबतचं पत्र सिद्धरामय्यांनी लिहिलं आहे.
Nana Patole : ‘शेतकरी सन्मान निधी योजना फसवी; 100 रुपये लटून एका रुपयाची मदत करणं ही बनियावृत्ती’
सिद्धरामय्या यांनी पत्रात म्हटलं की, कर्नाटकातील बेळगाव आणि गुलबर्गासह उत्तर कर्नाटकात पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर आहे. जनावरांना पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे कृष्णा भीमा नदीपात्रात 5 टीएमसी पाणी सोडावे. आधी कर्नाटकला 3 टीएमसी पाणी सोडण्याची विनवणी केली होती. आता 5 टीएमसी पाण्याची विनवणई करण्यात आली आहे.
डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह आठ डॉक्टरांचे राजीनामे
बेळगावसह उत्तर कर्नाटकाला पिण्यासाठी दोन टीएमसी पाणी वारणा व कोयना जलाशयामधून सोडले जावे. तसेच महाराष्ट्रातील उजनी जलाशयातून तीन टीएमसी पाणी सोडण्याबाबत संबंधित विभागाला सूचना केल्या जाव्यात. पाच टीएमसी पाणी जून महिन्यामध्ये सोडण्यात यावे, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
Ahmednagar name change : फडणवीसांचा होकार; अहिल्यानगरचा मुहूर्त ठरला…
दरम्यान, मागील वर्षी कर्नाटकच्या मलप्रभा जलाशयात 8.1 टीएमसी इतकी पाण्याची पातळी होती. मात्र यंदा 5.6 टीएमसी एवढी झाली असून हिप्परगी जलाशयात गेल्यावर्षी 1. 2 टीएमसी पाण्याची पातळी होती. आता ही पातळी 1.2 टीएमसी आहे.
तसेच आलमट्टी जलाशयात गेल्यावर्षी 2.3 टीएमसी पाण्याची पातळी होती यंदा तीच 5 .1 टीएमसी एवढी शिल्लक आहे. पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडल्यास पाण्याची टंचाई दूर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.