Nana Patole : ‘शेतकरी सन्मान निधी योजना फसवी; 100 रुपये लटून एका रुपयाची मदत करणं ही बनियावृत्ती’

Nana Patole : ‘शेतकरी सन्मान निधी योजना फसवी; 100 रुपये लटून एका रुपयाची मदत करणं ही बनियावृत्ती’

Nana Patole react on Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana : काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना लागू करण्याची घोषणा केली. या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून 6,000 रुपये आणि राज्य सरकारकडून 6,000 रुपये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचं सरकारने सांगितलं. दरम्यान, यावर आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली. सरकार शेतकर्‍यांकडून 100 रुपये लटून 1 रुपयाची मदत करत आहे. ही योजना म्हणजे, फसवी योजना असून यातून सरकारची बनियावृत्ती दिसून येते असल्याचं पटोले म्हणाले.

पटोले म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकार किंवा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे दोन्ही सरकारं शेतकरी विरोधी आहेत. मार्च-एप्रिल महिन्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या पावसाने शेतकऱ्यांच्या हातून घास हिसकावून घेतला होता. तेव्हा सरकारने आर्थिक मदतीची घोषणा विधानसभेत करूनही अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, आणि राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सरकार शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी शेतकरी सन्मान निधीच्या नावाखाली तुटपुंजी मदत देत आहे. भाजपप्रणीत शिंदे सरकार केवळ घोषणा करत आहे. शेतकर्‍यांकडून 100 रुपये लटायचे, अन् 1 रुपयाची मदत द्यायची ही बनियावृत्ती आहे, असं पटोले म्हणाले.

जान्हवीच्या किलर लूकचे नेटकरी दीवाने, पाहा फोटो

पटोले म्हणाले की, शेतकरी महासन्मान योजना बनावट आहे. महागाईमुळे शेती करणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळत नसल्याने ते आपला शेतमाल रस्त्यावर फेकून देत आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, हमीभावाची देणार ही आश्वासन केवळ पोकळ वल्गना होत्या. शेतकऱ्यांमध्ये भारतीय जनता पक्षाप्रती प्रचंड रोष असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे.

पटोले म्हणाले, आता निवडणूक डोळ्यांसमोर असल्याने त्यांना शेतकऱ्यांची आठवण आली, मात्र या किरकोळ मदतीचा शेतकऱ्यांवर काहीही परिणाम होणार नाही. शिंदे फडणवीस सरकारच्या या कारस्थानाला शेतकरी बळी पडणार नाहीत. सरकारकडून खते, बियाणे, कृषी साहित्यावर जीएसटी लावून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. सरकारला खरोखरच शेतकऱ्यांना मदत करायची असेल, तर कृषी साहित्यावरील, अवजरांवरील जीएसटीच्या माध्यमातून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवावी, असे पटोले यांनी सांगितलं.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube