नवी दिल्ली : मोदीजी, बाते मत बनाइये, भ्रष्टाचार की जाँच करवाइये, जेपीसी जांच बिठाइये!, या शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. याबाबतचं एक ट्विट करत त्यांनी हल्लाबोल केलाय. दरम्यान, गौतम अदानी प्रकरण विरोधकांकडून चांगलंच लावून धरण्यात येत असल्याचं दिसून येतं आहे. यावेळी खर्गेंनी संसदीय कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करीत ताशेरे ओढले आहेत.
देश के इतिहास में ऐसा पहली बार हुआ,
सत्ता पक्ष ने संसद को ठप्प कर, की "लोकतंत्र" की हत्या !"परम मित्र" को बचाने की क़वायद में रौंदे सारे संसदीय रिवाज़,
षड्यंत्र रच, डिसक्वालिफाई कर दबा दी विपक्ष की आवाज़!मोदी जी,
बाते मत बनाइये,
भ्रष्टाचार की जाँच करवाइये
JPC जांच बिठाइये ! pic.twitter.com/R0E2z2OCbW— Mallikarjun Kharge (@kharge) April 6, 2023
खर्गे म्हणाले, परममित्राला वाचविण्यासाठी पहिल्यांदाच देशात संसदीय कामकाज ठप्प करुन लोकशाही हत्या करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केला आहे. संसदीय कामकाजात काँग्रेसच्या खासदारांनी अदानी प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठी सत्ताधारी पक्षाने राहुल गांधींच्या लंडनमध्ये केलेल्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांनी माफी मागावी, असा दावा त्यांनी केला.
Photos : 2023 वर्षासाठीचे तीन पद्मविभूषण, पाच पद्मभूषण आणि 47 पद्मश्री पुरस्कार प्रदान
राहुल गांधी यांना 2019 च्या मानहानीच्या खटल्यात न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावताच त्यांना लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले. परंतु 2016 मध्ये भाजपचे खासदार नारनभाई कचडिया यांना तीन वर्षांची शिक्षा झाली असूनही न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी पूर्ण वेळ देण्यात आला होता. हीच लोकशाही आहे काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
‘मै सब का भाई नहीं हूं…’धमकी प्रकरणावर सलमान खानचे मोठं वक्तव्य
“दाल मे कुछ तो काला है”, म्हणूनच गौतम अदानी प्रकरणी जेपीसी स्थापन करण्याच्या मागणीवर विचार केला जात नाही. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते खर्गेंनी गौतम अदानीचा मुद्दा उपस्थित करत संसदेत हल्लाबोल केला आहे. आम्ही या प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची मागणी करत आहोत. सरकार जेपीसी स्थापन करण्यास का घाबरते? असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, सत्ताधारी सरकारची भूमिका अशीच असल्यास अधिवेशनाचं कामकाज सुरु ठेवू नये तसेच एक दिवस लोकशाही संपुष्टात येणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. तसेच सरकारच्या या भूमिकेविरोधात पुढील काळात विरोधी पक्ष एकत्र लढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय.