Congress : काँग्रेसने ( Congress) 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. 39 उमेदवारांच्या यादीत महाराष्ट्रातल्या एकाही जागेचा समावेश करण्यात आलेला नाही.
15 सर्वसामान्यांसह SC-ST, OBC उमेदवारांची संख्या किती?
काँग्रेसच्या पहिल्या यादीत 39 नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये छत्तीसगडमधून सहा, कर्नाटकातून सात, केरळमधून 16, लक्षद्वीपमधून एक, मेघालयातून दोन, नागालँडमधून एक, सिक्कीममधून एक, तेलंगणातून चार आणि त्रिपुरातून एक अशी नावे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये वायनाडमधून राहुल गांधी, तिरुअनंतपुरममधून शशी थरूर, अलप्पुझामधून केसी वेणुगोपाल, राजनांदगावमधून भूपेश बघेल, मेघालयमधून व्हिन्सेंट पाला आणि त्रिपुरा पश्चिममधून आशिष साहा यांची नावे समोर आली आहेत.
क्रांती रेडकरला जिवे मारण्याची धमकी, थेट पाकिस्तानशी कनेक्शन
काँग्रेसच्या 39 उमेदवारांच्या या पहिल्या यादीत 15 उमेदवार सर्वसाधारण गटातील आहेत, तर 24 उमेदवार मागासवर्गीय, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजातील आहेत. दुसरीकडे केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या 195 उमेदवारांची यादी जाहिर केली आहे. त्यामध्ये 34 केंद्रीय मंत्र्यांची नावे, 28 महिलांना संधी, 47 तरुण उमेदवार, ज्यांचे वय 50 वर्षांपेक्षा कमी आहे. अनुसूचित जातीतील 27 नावे, अनुसूचित प्रवर्गातील 18 उमेदवार, इतर मागास प्रवर्गातील 57 नावे आहेत.
‘रोहित पवारांचा कारखाना जप्त’; सुप्रियाताईंचा संताप, म्हणाल्या, ‘राजकारणाची..,’
काँग्रेसने केरळमध्ये कोणाला दिले तिकीट?
कासारगोडमधून राजमोहन उन्नीथन, कन्नूरमधून के सुधाकरन, वडकारामधून शफी पारंबिल, वायनाडमधून राहुल गांधी, कोझिकोडमधून एमके राघवन, पलक्कडमधून व्हीके श्रीकंदन, अलाथूर-एसीमधून रम्या हरिदास, त्रिसूरमधून के मुरलीधरन, चालकुड्डीमधून बेनी बेहनन, हिलाकुडी इथून एम.के. इडुक्कीमधून ईडन, इडुक्कीमधून डीन कुरियाकोसे, अलप्पुझामधून केसी वेणुगोपाल, मावेलिक्करा-एसीमधून कोडिकुनिल सुरेश, पथनामथिट्टामधून अँटो अँटोनी, अटिंगलमधून अदूर प्रकाश आणि तिरुवनंतपुरममधून शशी थरूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.