Download App

तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान काँग्रेस जिंकणारच; विरोधकांच्या बैठकीआधीच राहुल गांधींचा एल्गार

Rahul Gandhi :  बिहारच्या पाटण्यामध्ये देशातील विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, ठाकरे गटाचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आदी नेते उपस्थित आहे. याबैठकी आधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहार येथील काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले.

पाटण्यात विरोधकांच्या एकता बैठकीपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, ‘आम्ही मिळून भाजपचा पराभव करणार आहोत.’ कर्नाटकात आम्ही भाजपचा पराभव केला आहे. तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करेल, असा दावा त्यांनी केला.

Video : PM मोदींच्या भाषणावेळी 15 वेळा उभे राहिले खासदार, 79 वेळा झाला टाळ्यांचा कडकडाट

राहुल गांधी म्हणाले, देशात दोन विचारधारांची लढाई सुरू आहे, एकीकडे आमची भारत जोडो आणि दुसरीकडे भाजपची भारत तोड़ो विचारधारा आहे. भाजप भारत तोडण्याचे काम करत आहे. द्वेष आणि हिंसाचार पसरवण्याचे काम करत आहे आणि काँग्रेस पक्ष एकत्र येऊन प्रेम पसरवण्याचे काम करत आहे. द्वेष द्वेषाने तोडता येत नाही, द्वेष केवळ प्रेमानेच कापला जाऊ शकतो.

बैठकीला जाण्यापूर्वी राहुल गांधी यांनी पाटणा येथील काँग्रेस कार्यालयाला भेट दिली. येथील कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, नरेंद्र मोदी आणि भाजपचा अर्थ केवळ २-३ लोकांना फायदा मिळवून देणे हा आहे, तर काँग्रेसचा अर्थ देशातील गरिबांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्यासाठी काम करणे हा आहे.

Patna Opposition Parties Meeting : विरोधकांचे मिशन 2024! पण, राऊतांनी व्यक्त केली वेगळीच ‘भीती’

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही काँग्रेस कार्यालयावर बोलताना सांगितले की, या काँग्रेस कार्यालयातून जो नेता बाहेर पडला, त्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद याच भूमीतील होते याचा आम्हाला अभिमान आहे. आपण बिहार जिंकला तर संपूर्ण भारत जिंकू, असे विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Tags

follow us