Rahul Gandhi Challenges PM Narendra Modi : आज संसदेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान (Operation Sindoor) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी (Rahul Gandhi) सरकारवर घणाघाती टीका केली. चूक सैन्याची नाही तर सरकारची होती. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी 29 वेळा म्हटले आहे की आम्ही युद्ध (India Pakistan War) थांबवले आहे. जर हिंमत असेल तर पंतप्रधानांनी सभागृहात सांगावे की ट्रम्प खोटे बोलत आहेत. जर त्यांच्यात इंदिरा गांधींच्या 50 टक्केही हिंमत (Indira Gandhi) असेल तर ते येथे सांगतील.
राहुल गांधी पुढे म्हणाले, सरकारने सांगितलं होतं की 1.27 वाजेपर्यंत ऑपरेशन सुरू होते. रात्री 1.35 वाजता पाकिस्तानला फोन करुन माहिती देण्यात आली. पाकिस्तानला अशा पद्धतीने थेट माहिती का दिली गेली? पाकिस्तानला तुम्ही सांगितलं की आम्ही लढू इच्छित नाहीत. सरकारने पाकिस्तानसमोर अक्षरशः शरणागती पत्करली अर्ध्या तासात सरेंडर केलं. या सरकारमध्ये लढण्याची इच्छाशक्तीच नव्हती अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
सैनिक म्हणजे टायगरला तुम्ही बांधू शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरून राहुल गांधींचा सरकारवर वार
भारतीय सैन्यातील (Indian Army) जवान वाघ आहेत. वाघाला स्वातंत्र्य द्यावं लागतं. सैन्याच्या वापरासाठी इच्छाशक्तीची गरज असते. देशासाठी काम करायचं असेल तर जवानांना सूट द्यावी लागते. मी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं भाषण ऐकलं. त्यांनी ऑपरेशन सिंदूरची तुलना 1971 च्या युद्धाशी केली. 1971 मध्ये सरकारमध्ये इच्छाशक्ती होती. सन 1971 मध्ये आम्ही अमेरिकेचंही ऐकलं नव्हतं.
पहलगाममध्ये क्रूर असा (Pahalgam Terror Attack) दहशतवादी हल्ला झाला. अतिरेक्यांनी कुणालाच सोडलं नाही. अत्यंत क्रूरपणे त्यांनी लोकांची हत्या केली. आम्ही सगळेच पाकिस्तानचा निषेध करतो. सगळ्याच पक्षांनी सरकारचं समर्थन केलं होतं. अगदी दृढपणे सरकार आणि सैन्याच्या पाठीशी आम्ही उभे होतो. पहलगाममध्ये जे घडलं ते अतिशय चुकीचं होतं.
चीनने सॅटेलाइटच्या माध्यमातून सर्व माहिती पाकिस्तानला (India Pakistan War) दिली होती. आमचं म्हणणं ऐकलं असतं तर पाच लढाऊ विमानं गमवावी लागली नसती. चीनने पाकिस्तानच्या वायूसेनेला अपडेट केलं. पाकिस्तानी अधिकारी चीनकडूनच प्रशिक्षण घेत होते. आता आपली लढाई चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांशी आहे असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले.
पहलगाम हल्ल्यातील तिन्ही दहशतवादी ठार; शाहंची लोकसभेत घोषणा, महाकाल बनलं ऑपरेशन ‘महादेव’