पहलगाम हल्ल्यातील तिन्ही दहशतवादी ठार; शाहंची लोकसभेत घोषणा, महाकाल बनलं ऑपरेशन ‘महादेव’

  • Written By: Published:
पहलगाम हल्ल्यातील तिन्ही दहशतवादी ठार; शाहंची लोकसभेत घोषणा, महाकाल बनलं ऑपरेशन ‘महादेव’

Pahalgam Attack All 3 Terrorists Killed In Opration Mahadev Says Amit Shah : पहलगाम हल्ल्यातील तिन्ही दहशतवादी मारले काल (दि.28) श्रीनगरमधील ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेल्याची माहिती गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. यावेळी महाकाल बनलं ऑपरेशन ‘महादेव’ असेही शाह यांनी सांगितले. यावेळी सत्ताधारी खासदारांनी हर हर महादेवच्या घोषणा दिल्या.

अमित शहा म्हणाले, “पहलगाममध्ये निष्पाप नागरिकांची धर्म विचारून त्यांच्या कुटुंबियांसमोर त्यांची हत्या करण्यात आली, या हत्या अत्यंत क्रूरतेने करण्यात आल्या. मी याचा तीव्र निषेध करतो आणि मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. मात्र, संयुक्त ऑपरेशन महादेवमध्ये भारतीय सेना, सीआरपीएफ आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले आहे.

खात्मा केलेल्या दहशतवाद्यांची शाहंनी वाचली कुंडली

ऑपरेशन महादेवमध्ये सुलेमान उर्फ फैसल, अफगाण आणि जिब्रान हे तीन दहशतवादी भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मारले गेले. सुलेमान हा लष्कर-ए-तोयबाचा ए-श्रेणीचा कमांडर होता. अफगाण हा लष्कर-ए-तोयबाचा ए-श्रेणीचा दहशतवादी होता. तर, जिब्रानदेखील ए-श्रेणीचा दहशतवादी होता. या तीन दहशतवादीनी बैसरन खोऱ्यात आमच्या नागरिकांची हत्या केली मात्र, ऑपरेशन महादेव या दहशतवाद्यांसाठी कर्दनकाळ बनले आणि तिघानांही कंठस्थानी पोहचवण्यात आले आहे. 

दहशतवाद्यांकडून पाकिस्तानी चॉकलेट जप्त

ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करताना शाह म्हणाले की, हल्ल्यात तीन पाकिस्तानी दहशतवादी होते. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. दहशतवाद्यांकडून जप्त केलेले चॉकलेट पाकिस्तानात बनवटीचे होते. 

चिदंबरम यांचा प्रश्न म्हणजे पाकिस्तानवरील प्रेम

लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेदरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस खासदार आणि माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या विधानावर जोरदार हल्ला चढवला. दहशतवादी पाकिस्तानातून आले होते की नाही? असा प्रश्न चिदंबरम यांनी केला होता. त्यांचा हा म्हणजे देशाच्या माजी गृहमंत्र्यांनी पाकिस्तानला क्लीन चिट देण्यासारखा असून, चिदंबरम यांचे विधान म्हणजे संपूर्ण जगासमोर पाकिस्तानवरील त्यांच्या प्रेमाची कबुली असल्यासारखा आहे.

जे दहशतवादी पहलगाम हल्ल्यात सहभागी होते ते पाकिस्ताचेच होते याबाबत आमच्याकडे पुरावे आहेत आणि ते आम्ही संसदेच्या टेबलावर ठेवण्यास तयार आहोत. एवढेच नव्हे तर, आमच्याकडे मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी दोघांचे मतदार क्रमांकही आहेत. त्यांच्या खिशात पाकिस्तानी बनावटीचे चॉकलेटही सापडल्याचे शाह यांनी सांगितले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube